15 January 2021

News Flash

धोनीचा ‘हा’ नवीन लूक पाहिलात का?

धोनीच्या नव्या लूकचे फोटो व्हायरल

चेन्नई संघाचा कर्णधार एम.एस धोनी यष्टीरक्षणासाठी आणि आक्रमक फलंदाजीसाठी जसा ओळखला जातो तसाच तो त्याच्या केसांच्या विविध स्टाईलमुळेही प्रसिद्ध आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामाच्या सुरुवातीलाच धोनीने लूक बदलला होता. आता आरसीबीच्या सामन्यात पुन्हा एकदा कॅप्टन कूल धोनीचा नवीन लूक पाहायला मिळाला आहे. धोनीचा हा नवीन लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला आहे.

भारताचा माजी कर्णधार एम. एस धोनीचे सर्वच लूक सर्वांनी पाहिले आहे. धोनीने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं तेव्हा त्याच्या लांब केसांनी सर्वांनाच मोहिनी घातली होती. त्यानंतर धोनीने आपले केस कापले आणि नवीन लूक चाहत्यांसमोर आणला होता. त्यानंतर धोनीने आपल्या लूकमध्ये बरेच बदल केले आहेत. धोनीने प्रसिद्ध फुटबॉलपटूच्या केसांचा लूकही कॉपी केला होता. धोनीच्या प्रत्येक लूकची चर्चा होतेच.

आरसीबीच्या सामन्यापूर्वी धोनीने पुन्हा एकदा आपल्या लूकमध्ये बदल केला आहे. धोनीच्या या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. सामन्याच्या काही काळ आधी धोनीने लूक बदल्याची हिंट सीएसकेनं ट्विट करत दिली होती.

त्यामुळे धोनीचा नवीन लूक कसा आहे, हे पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर होते. अखेर नाणेफेकीवेळी धोनीच्या लूक सर्वांसमोर आला. धोनीचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस आला आहे.


धोनीच्या नव्या लूकचे फोटो चांगलेच व्हायरल झालेले पाहायला मिळत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2020 7:50 pm

Web Title: ipl 2020 ms dhoni sports new hairdo ahead of rcb vs csk nck 90
टॅग IPL 2020
Next Stories
1 धोनीने केदार जाधवला वगळलं, ‘या’ धडाकेबाज फलंदाला मिळाली संधी
2 IPL 2020: कर्णधार कार्तिक चमकला; २ वर्षांनी जुळून आला योगायोग
3 नेटकऱ्याचा रसेलच्या पत्नीला दुबाईला जाण्याचा सल्ला, पण …
Just Now!
X