07 March 2021

News Flash

MI vs DC : मुंबई आणि दिल्लीनं ‘या’ पाच प्रमुख खेळाडूंना दिला आराम

दिल्लीसाठी निर्णायक सामना

IPL 2020 : मुंबई इंडियन्स संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णायक सामन्यात मुंबई आणि दिल्लीनं आपल्या संघात महत्वाचे बदल केले आहेत. गेल्या सामन्यात पराभूत होणाऱ्या दिल्लीनं आपल्या संघात तीन बदल केले आहेत. तर मुंबईच्या संघानं आपल्या संघात दोन बदल केले आहेत.

दिल्लीनं आपल्या संघात तीन बदल केले आहेत. सलामी फलंदाज पृथ्वी शॉचं पुनरागमन झालं आहे. अजिंक्य रहाणेला आराम देण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेच्या जागेवर हर्षल पटेलला अय्यरनं आपल्या संघात स्थान दिलं आहे. त्याशिवाय फिरकी गोलंदाज प्रविण दुबे आज दिल्लीकडून पहिला सामना खेळत आहे. प्रविण दुबेला अक्षर पटेलच्या जागेवर स्थान देण्यात आलं आहे.  मुंबईने आजच्या सामन्यासाठी संघात दोन महत्वाचे बदल केले असून हार्दिक पांड्या आणि पॅटिन्सन यांना विश्रांती देण्यात आली असून त्या जागेवर जयंत यादव आणि कुल्टर-नाईल यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.

 

बाद फेरीत आपलं स्थान पक्क केल्यानंतर मुंबई इंडियन्ससमोर दिल्ली कॅपिटल्सचं आव्हान असणार आहे. प्ले-ऑफची फेरी गाठली असली तरीही मुंबई इंडियन्सचा संघ इतर संघाचं गणित बिघडवण्याचा प्रयत्न करु शकतो. गेल्या ३ सामन्यांमध्ये दिल्लीच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवून प्ले-ऑफचं तिकीट पक्क करण्याचा दिल्लीचा प्रयत्न असणार आहे. दिल्लीचा मुंबईनंतर बेंगळूरुशी सामना असल्याने त्यांची बाद फेरीची वाटचाल मुळीच सोपी नसेल

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 31, 2020 3:25 pm

Web Title: ipl 2020 mumbai and delhi five changes nck 90
Next Stories
1 IPL 2020 : ९ गडी राखत मुंबईचा दणदणीत विजय, दिल्लीसाठी प्ले-ऑफचं आव्हान खडतर
2 IPL 2020 : शतक हुकलेल्या गेलला संताप अनावर, बॅट फेकल्यामुळे सामनाधिकाऱ्यांकडून कारवाई
3 मी बॉलिंग करत असताना तो शतक करु शकणार नाही ! गेलची विकेट आणि आर्चरचं जुनं ट्विट व्हायरल
Just Now!
X