29 November 2020

News Flash

IPL 2020 : मुंबई इंडियन्सचे पारडे जड

आजच्या लढतीत कोलकाता नाइट रायडर्सकडून सुनील नरिनबाबत साशंकता

(संग्रहित छायाचित्र)

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट

धडाकेबाज फलंदाजांची फळी आणि अखेरच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्ध्यावर दडपण आणणारा गोलंदाजीचा मारा या बळावर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) सामन्यात पारडे जड मानले जात आहे.

मुंबई इंडियन्सने मागील चार सामन्यांत विजयी घोडदौड केली आहे. मात्र कोलकाताच्या संघापुढे अनेक समस्या आहेत. मागील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुकडून कोलकाताने ८२ धावांनी पराभव पत्करला होता.  अवैध गोलंदाजीच्या शैलीचा ठपका असलेला भरवशाचा फिरकी गोलंदाज सुनील नरिनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. बेंगळूरुविरुद्धच्या सामन्यात तो न खेळल्याचा कोलकाताला मोठा फटका बसला.

झायेद स्टेडियमवर कर्णधार रोहित शर्माने दोन अर्धशतके झळकावली आहेत. रोहितच्या खात्यावर आता एकूण २१६ धावा जमा आहे. उभय संघांमधील  याआधीच्या सामन्यात मुंबईने कोलकाताला ४९ धावांनी हरवले होते. त्या सामन्यातही रोहितने ८० धावा के ल्या होत्या. क्विंटन डीकॉक (१९१ धावा) आणि सूर्यकु मार यादव (२३३ धावा) आणि इशान किशन (१८६ धावा) यांचा समावेश असलेली मुंबईची मधली फळीसुद्धा सातत्याने धावा करीत विजयात मोलाची भूमिका बजावत आहे.

मुंबईकडे जसप्रित बुमरा, ट्रेंट बोल्ट आणि जेम्स पॅटिन्सन या वेगवान त्रिकुटासह हार्दिक पंडय़ा व किरॉन पोलार्ड अशी सामथ्र्यवान वेगवान गोलंदाजांची फळी आहे. बुमरा-बोल्ट-पॅटिन्सन यांनी एकूण ३१ बळी आतापर्यंत मिळवले आहेत. राहुल चहर आणि कृणाल पंडय़ा यांच्यावर फिरकीची मदार आहे.

दुसरीकडे, आंद्रे रसेलच्या फलंदाजीतील असातत्य ही कोलकातासाठी प्रमुख चिंता आहे. त्याने आतापर्यंत एकूण ७१ धावाच केल्या आहेत. शुभमन गिल, इऑन मॉर्गन, नितीश राणा व कर्णधार दिनेश कार्तिक यांच्यावर कोलकाताच्या फलंदाजीची भिस्त आहे.

कोलकाताच्या गोलंदाजांनीपंजाब आणि चेन्नईविरुद्ध निसटते विजय मिळवून दिले होते; परंतु बेंगळूरुविरुद्ध पॅट कमिन्स आणि प्रसिध कृष्णा यांनी अनुक्र मे ३८ व ४२ धावा दिल्या होत्या. कोलकाता कुलदीप यादवला पुन्हा संघात स्थान देण्याची शक्यता आहे. पहिल्या तीन सामन्यांनंतर तिसऱ्या वेगवान गोलंदाजाला स्थान देण्यासाठी कुलदीपला वगळण्यात आले होते.

* वेळ : सायं.७.३०वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:20 am

Web Title: ipl 2020 mumbai indians against kolkata knight riders match today abn 97
टॅग IPL 2020
Next Stories
1 कोहली-डीव्हिलियर्सवर बंदी घालावी -राहुल
2 …तर गेलचा फटका शारजावरुन अबु धाबीला जाईल ! गेलच्या वादळी खेळीवर युवराजची फटकेबाजी
3 IPL 2020 : पहिलाच सामना खेळणाऱ्या गेलने गाजवला दिवस, कर्णधाराने केलं कौतुक
Just Now!
X