मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आणि सलामी फलंदाज रोहित शर्माला कोलकाता विरोधातील सामन्यात मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या सामन्या रोहित शर्माने ८० धावांची दमदार आणि सामन्याला कलाटनी देणारी खेळी केली. रोहितच्या दमदार फलंदाजीच्या बळावर या सामन्यात मुंबईचा ४९ धावांनी विजय झाला. या सामन्यात 80 धावा करणारा रोहित शर्मा मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला. यासह त्यानं IPLमध्ये सर्वाधिक १८ मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूचा मान पटकावला. त्यानं महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) ला मागे टाकले. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच जिंकणाऱ्या खेळाडूमध्ये रोहित आता तिसऱ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. रोहित शर्माने डेविड वॉर्नर आणि एम. एस. धोनी यांचा विक्रम मोडला आहे.

रोहित शर्माने ३९ चेंडूत अर्धशतक झळकावलं. या सामन्यात रोहित शर्माने ५४ चेंडूत तीन चौकर आणि सहा षटकारांसह ८० धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर आयपीएलमधील १८ वा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार रोहितने पटकावला. सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच पुरस्कारांच्या बाबतीत रोहित शर्मा डेविड वॉर्नर आणि धोनीच्याही पुढे गेला आहे. धोनी आणि वॉर्नरच्या नावावर १७-१७ पुरस्कारांची नोंद आहे.

सर्वाधिक मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराच्या बाबतीत रोहित शर्माच्या पुढे ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलिअर्स आहे. गेलने आतापर्यंत २१ वेळा तर डिव्हिलिअर्सने २० वेळा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पटकावला आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिकवेळा मॅन ऑफ दी मॅच पुरस्कार पटकावणारे खेळाडू

ख्रिस गेल – २१
एबी डिव्हिलियर्स – २०
रोहित शर्मा – १८
एम.एस. धोनी – १७
डेविड वॉर्नर – १७
यूसुफ पठान – १६