‘आयपीएल’च्या बाद फेरीमधील स्थान निश्चित झालेल्या मुंबई इंडियन्सने शनिवारी बलाढय़ दिल्ली कॅपिटल्सच्या योजना हाणून पाडण्याचा निर्धार केला आहे.

चेन्नई सुपर किंग्जने गुरुवारी कोलकाता नाइट रायडर्सला सहा गडी राखून हरवल्यामुळे मुंबईचे बाद फेरीतील स्थान पक्के झाले. परंतु १४ गुण खात्यावर असलेल्या दिल्लीला उर्वरित दोन सामन्यांमध्ये बाद फेरीसाठी दावेदारी करता येईल. किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्याकडून सलग तीन सामन्यांमधील पराभवांमुळे त्यांना बाद फेरीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे. दिल्लीचा मुंबईनंतर बेंगळूरुशी सामना असल्याने त्यांची बाद फेरीची वाटचाल मुळीच सोपी नसेल.

* सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १