News Flash

IPL 2020 : पंजाबचे दिल्लीवरही दडपण

उभय संघांनी एकमेकांविरुद्धच्या लढतीनेच यंदाच्या हंगामाला प्रारंभ केला होता

(संग्रहित छायाचित्र)

सुरुवातीच्या सात सामन्यांपैकी अवघी एक लढत जिंकणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबच्या संघाने गेल्या दोन सामन्यांत अनुक्रमे रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु आणि मुंबई इंडियन्ससारख्या बलाढय़ संघांना नमवल्यामुळे त्यांचे ‘आयपीएल’मधील आव्हान अद्यापही कायम आहे. त्यामुळेच मंगळवारी गुणतालिकेच्या अग्रस्थान विराजमान असलेल्या दिल्ली कॅपिटल्सलासुद्धा ते धक्का देणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

उभय संघांनी एकमेकांविरुद्धच्या लढतीनेच यंदाच्या हंगामाला प्रारंभ केला होता. त्या वेळी दिल्लीने सुपर ओव्हरमध्ये सरशी साधली होती. त्यामुळे पंजाब त्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. दुसरीकडे दिल्ली आठव्या विजयासह बाद फेरीतील स्थान पक्के करण्यासाठी उत्सुक आहे.

* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी,१ सिलेक्ट

प्रवीण दुबे दिल्ली संघात

दुबई : कर्नाटकचा लेगस्पिनर प्रवीण दुबेचा अमित मिश्राऐवजी दिल्ली कॅपिटल्सच्या संघात समावेश करण्यात आला आहे. ३७ वर्षीय मिश्राला हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. त्यामुळे २७ वर्षीय दुबेला स्थान देण्यात आले असून दुबेने १४ प्रथम श्रेणी सामन्यांत १६ बळी मिळवले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:19 am

Web Title: ipl 2020 punjab oppression on delhi too abn 97
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: राजस्थानचा ‘रॉयल’ कारभार; चेन्नईवर केली सहज मात
2 VIDEO: …अन् धोनीने हवेत उडी घेत टिपला एका हाताने भन्नाट झेल
3 IPL 2020: “निर्लज्ज, तू फिर आ गया”; केदार जाधवच्या खेळीनंतर भन्नाट मीम्स व्हायरल
Just Now!
X