01 December 2020

News Flash

IPL 2020 : राजस्थानची आज बेंगळूरुशी लढत

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुने आठपैकी पाच सामने जिंकले आहेत

विराट कोहली देवधर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात नेतृत्व करणारा दुसरा सर्वात युवा खेळाडू आहे. २००९-१० मध्ये अंतिम सामन्यात जेव्हा त्यानं संघाचं नेतृत्व केलं होतं त्यावेळी त्याचं वय २१ वर्ष आणि १२४ दिवस होतं. गेल्या वर्षी शुभमन गिलनं (२० वर्ष आणि ५७ दिवस) विराटचा विक्रम तोडला होता.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुने केलेल्या अक्षम्य चुका पराभवास कारणीभूत ठरल्या. त्यामुळे आता शनिवारी रंगणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रणनीती सुधारण्यावर बेंगळूरुचा भर राहील.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळूरुने आठपैकी पाच सामने जिंकले आहेत. या पाच विजयांत बेंगळूरुने मुंबई इंडियन्सवर ‘सुपर-ओव्हर’मध्ये मात केली होती. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सची सलामीची जोडी अपयशी ठरल्याने त्यांची सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

* सामन्याची वेळ : दुपारी ३.३० वा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 12:04 am

Web Title: ipl 2020 rajasthan match against bangalore today abn 97
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : अय्यरच्या समावेशाची दिल्लीला चिंता
2 IPL 2020 : डी-कॉक ठरतोय मुंबईचा हुकुमाचा एक्का, अबु धाबीत KKR च्या गोलंदाजांची धुलाई
3 IPL 2020 : तुझी-माझी जोडी जमली रे ! हिटमॅन-डी कॉकच्या भागीदारीमुळे KKR बेजार
Just Now!
X