News Flash

IPL 2020 : RCB ची प्रयोगशाळा, तेराव्या हंगामात नवीन जोडीला दिली संधी

पडीकल-फिंच RCB कडून सलामीला

फोटो सौजन्य - Saikat Das / Sportzpics for BCCI

आयपीएलच्या तेराव्या हंगामात विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासमोर पहिल्याच सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या सनराईजर्स हैदराबादचं आव्हान आहे. दुबईच्या मैदानात नाणेफेक जिंकून हैदराबादने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यंदा RCB च्या संघात काही नवीन खेळाडू आल्यामुळे हा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. सलामीच्या जोडीसाठी RCB ने देवदत्त पडीकल आणि ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरोन फिंचला संधी दिली.

या निमीत्ताने RCB चा संघ हा आयपीएलच्या इतिहासात सलामीच्या जोडीसाठी सर्वाधिक प्रयोग करणारा संघ ठरला आहे. पडीकल आणि फिंच च्या रुपाने RCB ची आयपीएलच्या इतिहासातली ही ५९ वी सलामीची जोडी होती.

स्थानिक स्पर्धेत खेळत असताना पडीकलने केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला यंदा RCB मध्ये स्थान देण्यात आलं आहे. तर गेल्या काही सामन्यात फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या संघानेही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या सामन्यांमध्ये RCB आपल्या याच जोडीवर विश्वास दाखवतं का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 7:52 pm

Web Title: ipl 2020 rcb try 59 opening pair throughout the ipl history psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 विराट कोहली नाही सिमरनजीत, डिव्हीलियर्स नाही पारितोष…जाणून घ्या काय आहे हे नेमकं प्रकरण?
2 IPL 2020 : हैदराबादची हाराकिरी ! हातातला सामना RCB ला केला बहाल
3 पहिल्या सामन्याआधी वॉर्नरला मिळाल्या खास व्यक्तीकडून शुभेच्छा
Just Now!
X