03 December 2020

News Flash

IPL 2020 : संजू सॅमसनच्या अपयशाची मालिका सुरुच, RCB विरुद्ध सामन्यात स्वस्तात बाद

युजवेंद्र चहलने घेतला बळी

(संग्रहित छायाचित्र)

आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलामीच्या दोन सामन्यांमध्ये धडाकेबाज अर्धशतकी खेळी करुन संजू सॅमसनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. चेन्नईविरुद्ध ७४ आणि पंजाबविरुद्ध ८५ धावांची खेळी सॅमसनने केली होती. या खेळीनंतर सोशल मीडियावर सर्वच स्तरातून संजू सॅमसनचं कौतुक होत होतं. अनेकांनी ऋषभ पंतच्या जागी संघात सॅमसनला स्थान द्यायला हवं अशीही मागणी केली. मात्र यानंतर संजू सॅमसनच्या बॅटमधून धावांचा ओघ पूर्णपणे आटलेला आहे.

पहिल्या दोन सामन्यांमध्ये मिळून १५९ धावा करणाऱ्या संजू सॅमसनने नंतरच्या सात धावांमध्ये फक्त ७७ धावा केल्या आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे या सात सामन्यांपैकी फक्त दोन सामन्यांत संजू दोन आकडी धावसंख्या गाठू शकला आहे. याव्यतिरीक्त उर्वरित सर्व सामन्यांमध्ये संजूच्या पदरी अपयशच आलं आहे.

रॉयलल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यात राजस्थानने आश्वासक सुरुवात केली होती. बेन स्टोक्स आणि रॉबिन उथप्पा या जोडीने सलामीच्या जोडीसाठी ५० धावांची भागीदारी केली. यानंतर मैदानात आलेल्या संजू सॅमसनने युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर खणखणीत षटकार मारत चांगली सुरुवात केली. मात्र चहलने आपल्या एकाच षटकात उथप्पा आणि सॅमसनला माघारी धाडत राजस्थानला मोठे धक्के दिले. सॅमसन ९ धावा काढून बाद झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 4:39 pm

Web Title: ipl 2020 rcb vs rr sanju samson once again fail his poor show continues psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 VIDEO: उथप्पाला सूर गवसला; एकाच षटकात ठोकले ४ चौकार
2 IPL 2020 : मुंबईविरुद्ध KKR पराभूत, कर्णधार मॉर्गनने सलामीच्या फलंदाजांवर फोडलं खापर
3 IPL २०२० : टॉप चार संघ कोणते? पर्पल, ऑरेंज कॅप कोणाकडे
Just Now!
X