01 December 2020

News Flash

IPL 2020 : ‘हिटमॅन’चा विजयी ‘पंच’, अंतिम सामन्यात बजावली महत्वाची भूमिका

दिल्लीविरुद्ध नाबाद अर्धशतक, मुंबईचं सलग दुसरं विजेतेपद

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने सलग दुसऱ्या हंगामात आपली धडाकेबाज कामगिरी सुरु ठेवत विजेतेपदावर मोहर उमटवली आहे. पहिला अंतिम सामना खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सवर ५ गडी राखून मात करत मुंबई इंडियन्सने आपलं पाचवं विजेतेपद पटकावलं आहे. कर्णधार रोहित शर्माने अंतिम सामन्यात आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे.

कर्णधार या नात्याने आयपीएलचं विजेतेपद पटकावण्याची रोहितची ही पाचवी वेळ ठरली आहे. तर रोहितचं हे एकंदरीत सहावं विजेतेपद ठरलंय.

५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह रोहितने ६८ धावांची खेळी केली. साखळी फेरीत रोहित दुखापतीमुळे काही सामने खेळू शकला नव्हता. यामुळे त्याला भारतीय संघात आपलं स्थानही गमवावं लागलं. परंतू यावरही यशस्वीरित्या मात करत रोहितने अर्धशतकी खेळी करत आपला फॉर्म पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 11:17 pm

Web Title: ipl 2020 rohit sharma bags 5th ipl tital as a captain 6th overall psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 Video : रोहितसाठी सूर्यकुमारने स्वत:च्या विकेटवर सोडलं पाणी, नेटकरीही झाले फिदा
2 IPL 2020 : स्टॉयनिस शून्यावर बाद पण सोशल मीडियावर गंभीर होतोय ट्रोल, जाणून घ्या कारण…
3 IPL 2020 : श्रेयसची कर्णधारपदाला साजेशी खेळी, धोनी-रोहित-कोहलीच्या पंगतीत स्थान
Just Now!
X