News Flash

IPL 2020 : नाणेफेक जिंकून हैदराबादची फलंदाजी, CSK मध्ये रायुडू-ब्राव्होला स्थान

पाहा चेन्नईच्या संघात काय झाले बदल, कोणाचा पत्ता झाला कट

फोटो सौजन्य - SAMUEL RAJKUMAR / Sportzpics for BCCI

तब्बल आठवडाभराच्या अंतराने महेंद्रसिंह धोनीचा संघ मैदानावर उतरला आहे. दुबईच्या मैदानावर सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात महेंद्रसिंह धोनीने अखेरीस आपल्या संघात महत्वपूर्ण बदल केले आहेत. हैदराबादचा कर्णधार वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही सामन्यांत चेन्नईच्या संघाची कामगिरी खराब झाली होती. यासाठी धोनीने आजच्या सामन्यासाठी अंबाती रायुडू, ड्वेन ब्राव्हो आणि शार्दुल ठाकूर यांना संघात स्थान दिलं आहे. मुरली विजय, जोश हेजलवूड आणि ऋतुराज गायकवाड यांना चेन्नईने आज विश्रांती दिली आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम आता धोनीच्या नावावर जमा झाला आहे. सनराईजर्स हैदराबादविरुद्धचा सामना धोनीचा आयपीएलमधला १९४ वा सामना ठरला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून धोनी आणि रैना चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे सदस्य आहेत. २०१६ आणि २०१७ या दोन हंगामात चेन्नई संघावर कारवाई करण्यात आली होती. ज्यावेळी धोनी पुणे संघाकडून तर रैना गुजरातकडून खेळला. मात्र यंदाच्या हंगामात रैनाने खासगी कारणांमुळे माघार घेतलेली असल्यामुळे धोनीला आपल्या जवळच्या मित्राचा विक्रम मोडत अव्वल स्थान पटकावलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2020 7:18 pm

Web Title: ipl 2020 srh vs csk ms dhoni made 3 changes in team psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा, जवळच्या मित्राचा विक्रम मोडला
2 IPL 2020 : तुजविण सख्या रे ! साक्षीला येतेय धोनीची आठवण
3 रैना, हरभजनसाठी संघाची दार कायमची बंद? CSK मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Just Now!
X