News Flash

IPL 2020 : जोफ्रा आर्चरचे हैदराबादला दणके, वॉर्नर-बेअरस्टोला स्वस्तात धाडलं माघारी

हैदराबादच्या डावाची खराब सुरुवात

फोटो सौजन्य - IPL

आयपीएलच्या तेराव्या हंगामातली रंगत अजुनही शिल्लक आहे. युएईत सुरु असलेली ही स्पर्धा आता उत्तरार्धाकडे झुकत चालली आहे. सर्व संघ प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठछी धडपड करत आहेत. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्यात, हैदराबादच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात टिच्चून मारा करत राजस्थानचा १५४ धावांवर रोखलं. १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादची सुरुवातही खराब झाली.

जोफ्रा आर्चरने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि त्याचा साथीदार जॉनी बेअरस्टोला माघारी धाडलं. पहिल्याच षटकात ४ धावा काढून वॉर्नर माघारी परतला. याआधी २०१६ साली डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात बाद झाला होता. अशोक दिंडाने त्याला माघारी धाडलं होतं. यानंतर ४ वर्षांनी वॉर्नरवर ही वेळ आली आहे.

यानंतरतच्या षटकात आर्चरने बेअरस्टोचा त्रिफळा उडवत संघाला आणखी एक यश मिळवून दिलं. बेअरस्टो १० धावा काढून बाद झाला. त्याआधी संकाटात सापडलेल्या राजस्थान रॉयल्सला जोफ्रा आर्चरने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करुन १५४ धावांचा पल्ला गाठून दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2020 9:56 pm

Web Title: ipl 2020 srh vs rr jofra archer sends warner and bairstow in quick session psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : याला म्हणतात पुनरागमन ! जेसन होल्डरची चमकदार कामगिरी
2 IPL 2020 : पांडे-शंकर जोडीची संयमी भागीदारी, हैदराबादची राजस्थानवर मात
3 IPL 2020 : अखेरच्या स्थानावर फेकल्या गेलेल्या पंजाबची जोरदार मुसंडी, जाणून घ्या नेमका काय झाला बदल??
Just Now!
X