सूर्यकुमार यादवची नाबाद अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने केलेला भेदक मारा या जोरावर मुंबई इंडियन्सने RCB वर ५ गडी राखून मात करत, प्ले-ऑफसाठी आपली दावेदारी जवळपास पक्की केली आहे. अबुधाबीच्या मैदानावर झालेल्या रंगतदार सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला. एकीकडे इतर फलंदाज माघारी परतत असताना सूर्यकुमारने एक बाजू लावून धरत मुंबई इंडियन्सचं आव्हान कायम राखलं.
हार्दिक पांड्यासोबत छोटेखानी भागीदारी करताना सूर्यकुमारने RCB च्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. हार्दिक पांड्यानेही त्याला उत्तम साथ देत मॉरिसच्या गोलंदाजीवर सुंदर षटकार खेचला. हा फटका खेळल्यानंतर हार्दिकने मॉरिसला काहीतरी बोलून डिवचण्याचा प्रयत्न केला. यानंतर पुढच्याच चेंडूवर मॉरिसने हार्दिकला बाद करत आपला बदला घेतला. यावेळी माघारी परतत असताना हार्दिक आणि RCB च्या खेळाडूंमध्ये मैदानावर चांगलीच जुंपलेली पहायला मिळाली. पाहा हा व्हिडीओ…
यानंतर डगआऊटमध्ये बसलेला हार्दिक पांड्या रागातच दिसत होता. सूर्यकुमार यादवने विजयी चौकार मारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. यावेळी हार्दिकने डगआऊटमध्ये उभं राहून आपली आक्रमक प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. यावेळी सूर्यकुमारनेही मी आहे ना ! असं म्हणून हार्दिकला शांत करण्याचा प्रयत्न केला. पाहा सूर्यकुमारचा समंजसपणा…
Calmness.pic.twitter.com/eR6JQTeciK
— Mumbai Indians (@mipaltan) October 28, 2020
RCB कडून मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २-२ तर ख्रिस मॉरिसने १ बळी घेतला. परंतू मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात ते अपयशी ठरले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 28, 2020 11:46 pm