07 March 2021

News Flash

Video : रोहितसाठी सूर्यकुमारने स्वत:च्या विकेटवर सोडलं पाणी, नेटकरीही झाले फिदा

सूर्यकुमारची ती कृती ठरतेय चर्चेचा विषय

गतविजेत्या मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात अंतिम सामना खेळताना नेहमीप्रमाणे आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. दिल्ली कॅपिटल्सला १५६ धावांवर रोखल्यानंतर मुंबईकडून कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉकने आश्वासक सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी केल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला.

सूर्यकुमारनेही आपल्या कर्णधाराला उत्तम साथ देत सामन्यावर मुंबईचं वर्चस्व कायम राहील याची काळजी घेतली. रोहित शर्मा अंतिम सामन्यात चांगल्या फॉर्मात फटकेबाजी करत होता. रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात रोहित आणि सूर्यकुमारमध्ये गोंधळ निर्माण झाला. रोहित नॉन स्ट्राईक एंडपर्यंत पोहचल्यावर त्याची विकेट धोक्यात असल्याचं लक्षात येताच सूर्यकुमारने स्वतःच्या विकेटवर पाणी सोडत रोहितला वाचवलं. पाहा हा व्हिडीओ…

हा प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनीही सूर्यकुमारचं कौतुक केलंय.

१९ धावा काढून सूर्यकुमार यादव बाद झाला. यानंतर कर्णधार रोहित शर्माने फटकेबाजी करत सामन्यावर आपली पकड ढिली होणार नाही याची काळजी घेतली. रोहित शर्माही अखेरच्या षटकांत मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ६८ धावा काढून बाद झाला. नॉर्जने त्याचा बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 10:47 pm

Web Title: ipl 2020 suryakumar yadav scarifies his wickt for rohit fans praise him psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : स्टॉयनिस शून्यावर बाद पण सोशल मीडियावर गंभीर होतोय ट्रोल, जाणून घ्या कारण…
2 IPL 2020 : श्रेयसची कर्णधारपदाला साजेशी खेळी, धोनी-रोहित-कोहलीच्या पंगतीत स्थान
3 IPL 2020 : देर आए दुरुस्त आए, मोक्याच्या क्षणी ऋषभला गवसला सूर पण…
Just Now!
X