26 October 2020

News Flash

IPL 2020 : तुमचे केस भारी, तुमची पोझ भारी ! अंपायर पश्चिम पाठकांवर नेटकरी फिदा

पहिल्यांदाच पंच ठरतायत चर्चेचा विषय

अबु धाबीच्या मैदानावर सनराईजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामन्याला सुरुवात झाली. हैदराबादचा कर्णधार डेव्हीड वॉर्नरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयपीएल म्हणलं की सोशल मीडियावर एखादी घटना, एखाद्या खेळाडूची कामगिरी हा नेहमी नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय होतो. परंतू हैदराबाद विरुद्ध कोलकाता सामन्यात पहिल्यांदाच अंपायर नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरले आहेत.

अंपायर पश्चिम पाठक आणि एस. रवी यांनी मैदानावर पाऊल टाकलं. पश्चिम पाठक यांचे वाढलेले केस पाहून सोशल मीडियावर अनेकांना या सामन्यात महिला अंपायर असल्यासारखं वाटलं. परंतू खरी गोष्ट समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी पश्चिम पाठक यांची हेअरस्टाईल, त्यांची अंपायरिंग करताना उभी राहण्याची पद्धत यावर मिम्स तयार करायला सुरुवात केली.

२०१४ साली पाठक यांनी पहिल्यांदा आयपीएल सामन्यांमध्ये पंच म्हणून कामगिरी केली. आतापर्यंत त्यांनी ८ सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केलं आहे. २०१२ साली पश्चिम पाठक यांनी महिला संघाच्या दोन वन-डे सामन्याच पंच म्हणून काम केलं. २००९ पासून पश्चिम पाठक भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 6:03 pm

Web Title: ipl 2020 umpire paschim pathaks rockstar hairstyle has twitter on overdrive memes rain on social media psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: कार्तिक-मॉर्गनची तुफान फटकेबाजी; कोलकाताची १६०पार मजल
2 Video : राशिद खानच्या गोलंदाजीवर प्रियम गर्गचा भन्नाट झेल
3 IPLच्या १३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
Just Now!
X