आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये सूर हरवलेल्या विराट कोहलीला अखेरीस सूर गवसला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात १९७ धावांचा पाठलाग करताना दुबईच्या मैदानावर RCB च्या संघाची खराब सुरुवात झाली. फॉर्मात असलेला पडीकल, फिंच, डिव्हीलियर्स हे सर्व फलंदाज लवकर माघारी परतले. परंतू विराट कोहलीने एक बाजू लावून धरत दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगला सामना केला. मैदानावर स्थिरावत कोहलीने ३९ चेंडूत २ चौकार आणि एका षटकारासह ४३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान विराटने टी-२० क्रिकेटमध्ये एका मोठ्या विक्रमाची नोंद केली आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये ९ हजार धावांचा टप्पा ओलांडलणारा विराट पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. २७० डावांमध्ये विराटने ही कामगिरी करुन दाखवली आहे.

जाणून घ्या विराटच्या विक्रमी खेळीबद्दल आणखी काही महत्वाची आकडेवारी…

उर्वरित फलंदाज एकामागोमाग एक बाद होत असताना विराटने एक बाजू लावून धरत दिल्लीच्या गोलंदाजांचा सामना करण्याचा प्रयत्न केला. परंतू दुसऱ्या बाजूने त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही. अखेरीस कगिसो रबाडाच्या गोलंदाजीवर विराटही यष्टीरक्षक पंतकडे झेल माघारी परतला.