21 September 2020

News Flash

Video : पाहा, विराट कशी घेतो स्वतःच्या बॅटची काळजी

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून या हंगामाला सुरुवात होणार असून मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगणार आहे. क्रिकेटर कोणातही असो आपली बॅट व इतर सर्व गोष्टींची काळजी घेणं त्याला नेहमी आवडतं. RCB चा कर्णधार विराट कोहलीही याला अपवाद नाहीये. RCB च्या संघाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. कर्णधार विराट कोहलीनेही नेट्समध्ये फलंदाजीचा सराव सुरु केला आहे.

विराटने इन्स्टाग्रामवर आपल्या बॅटची आपण कशी काळजी घेतो हे दाखवणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात धोनी हातात करवत घेऊन बॅटमधला अनावश्यक भाग कापताना दिसत आहे.

RCB च्या संघाला आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत एकदाही स्पर्धेचं विजेतेपद मिळवता आलेलं नाही. २१ सप्टेंबरला सनराईजर्स हैदराबादविरुद्ध RCB आपला या हंगामातला पहिला सामना खेळेल. त्यामुळे यंदा विराट कोहलीचा RCB संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 4:50 pm

Web Title: ipl 2020 virat kohli loves taking care of his bats share video on social media psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : KKR ला दिलासा, इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू सलामीच्या सामन्यासाठी उपलब्ध
2 IPL 2020 : CSK संघात रैनाच्या जागी ड्वाइड मलानला संधी??
3 कोहली सर्वोत्तम एकदिवसीय फलंदाज -स्मिथ
Just Now!
X