News Flash

Video : …आणि विराट पुन्हा तोंडावर आपटला, षटकार लगावत मनिष पांडेने केली बोलती बंद

याआधी मुंबईविरुद्ध सामन्यात विराटने सूर्यकुमारलाही केलं होतं स्लेजिंग

आपल्या पहिल्या विजेतेपदाचं स्वप्न उराशी घेऊन मैदानात उतरलेल्या RCB च्या संघाचं पुन्हा एकदा स्वप्न भंगलं आहे. अबु धाबीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात हैदराबादने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर ६ गडी राखून मात केली. या पराभवासह RCB चं स्पर्धेतलं आव्हानही संपुष्टात आलं आहे. विजयासाठी दिलेलं १३२ धावांचं हैदराबादकडून विल्यमसन-होल्डरने संयमी फलंदाजी करत पूर्ण केलं. विल्यमसनने नाबाद अर्धशतक झळकावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. अखेरच्या षटकापर्यंत मैदानावर टिकून राहत विल्यमसनने नाबाद ५० धावा केल्या. त्याला होल्डरने २४ धावा करत मोलाची साथ दिली.

अवश्य वाचा – BLOG : RCB आणि विराटला नव्याने विचार करण्याची गरज !

१३२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या संघाची सुरुवातही खराब झाली. श्रीवत्स गोस्वामी स्वस्तात बाद झाल्यानंतर मनिष पांडे आणि वॉर्नर जोडीने संघाचा डाव सावरला. वॉर्नर-पांडे जोडी मैदानावर स्थिरावल्यानंतर RCB च्या संघावरचं दडपण टाकलं. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर फलंदाजी करत असलेल्या मनिष पांडेला विराट कोहलीने स्लेजिंग करत…आज नही मारेगा शॉट?? असा प्रश्न विचारला. मनिष पांडेनेही त्याच्या पुढच्याच चेंडूवर धडाकेबाज षटकार लगावत विराट कोहलीची बोलती बंद केली. पाहा हा व्हिडीओ…

अखेरच्या षटकापर्यंत सामन्यात रंगत निर्माण करत RCB च्या गोलंदाजांनी हैदराबादला चांगली टक्कर देण्याचा प्रयत्न केला. परंतू विल्यमसन-होल्डर जोडीसमोर त्यांची डाळ शिजू शकली नाही. अखेरच्या षटकात विजयासाठी ८ धावांची गरज असताना होल्डरने २ चौकार लगावत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : विराटने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही – गावसकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 3:29 pm

Web Title: ipl 2020 virat kohli sledges manish pandey srh batsman gives it back in style psd 91
Next Stories
1 IPL 2020 : विराट कोहली सांगणार नाही, मॅनेजमेंटला निर्णय घ्यावा लागेल !
2 …जेव्हा गंभीर आणि कोहली IPL सामन्यादरम्यान भिडले होते
3 IPL 2020 : विराटने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केला नाही – गावसकर
Just Now!
X