27 September 2020

News Flash

आयपीएलच्या ट्रॉफीवरील ‘या’ संस्कृत ओळीचा अर्थ माहिती आहे का??

१९ सप्टेंबरपासून IPL च्या तेराव्या हंगामाला सुरुवात

आयपीएलचा तेरावा हंगाम आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. १९ सप्टेंबरपासून युएईत तेरावा हंगाम खेळवला जाईल. अबु धाबीत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात सलामीचा सामना रंगेल. यंदा करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता यंदा प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. आयपीएलची ट्रॉफी हा नेहमी चर्चेचा विषय असतो, या ट्रॉफीवर एक संस्कृत भाषेत ओळ लिहली आहे. ही ओळ डोळ्यांना सहज दिसत नसली तरीही या वाक्याचा अर्थ मोठा आहे.

वैदिक स्कुल या ट्विटर हँडलवर आयपीएलच्या ट्रॉफीवरील या संस्कृत ओळींचा अर्थ सांगण्यात आलेला आहे. “यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोतिही”, ही संस्कृत गेली अनेक वर्ष आयपीएलच्या ट्रॉफीवर आपलं स्थान टिकवून आहे. या वाक्याचा अर्थ, जिथे तुमच्यातल्या प्रतिभेला संधी मिळते असा होतो.

भारतात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता यंदाची स्पर्धा होणार की नाही यावर गेल्या काही दिवसांत अनेक चर्चा सुरु होत्या. परंतू यंदाची स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता होती. यासाठी बीसीसीआयने ही स्पर्धा युएईत हलवली. दरम्यान तेराव्या हंगामासाठी बीसीसीआयने VIVO या चिनी मोबाईल कंपनीसोबत आपला करार स्थगित करुन Dream 11 या कंपनीला २२२ कोटी रुपयांमध्ये स्पॉन्सरशीपचे हक्क दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 6:47 pm

Web Title: ipl 2020 what is written in sanskrit on the ipl trophy know details here psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 TV Presenter नेरोली मेडोव्जचं IPL मध्ये पदार्पण
2 IPL 2020 : मुंबईच्या गोलंदाजाचं फलंदाजांना आव्हान, सरावात तोडला स्टंप
3 हॅरी गर्नीऐवजी अली खानला कोलकाताच्या संघात स्थान
Just Now!
X