आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जची कामगिरी आतापर्यंत फारशी आश्वासक राहिलेली नाही. परंतू संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. शुक्रवारी सनराईजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात चेन्नईला पराभवाचा सामना करावा लागला. परंतू या सामन्यात रविंद्र जाडेजाने अर्धशतक झळकावत आयपीएलमध्ये २ हजार धावा आणि ११० बळी अशी अनोखी कामगिरी करणारा एकमेव खेळाडू हा बहुमान पटकावला आहे.

अवश्य वाचा – BLOG : दमलेल्या धोनीची ही कहाणी…

हैदराबादविरुद्ध सामन्यात १६५ धावांचा पाठलाग करताना जाडेजाने ३५ चेंडूत ५० धावा केल्या. या अर्धशतकी खेळीदरम्यान जाडेजाने ५ चौकार आणि २ षटकारही लगावले. या कामगिरीमुळे मला अधिक हुरुप आला असून संघासाठी अधिक चांगली कामगिरी करण्याचा माझा मानस असल्याचं जाडेजाने बोलून दाखवलं. सध्या चेन्नई सुपरकिंग्जचा महत्वाचा खेळाडू असलेल्या जाडेजाने आयपीएलमध्ये राजस्थान, कोची, गुजरात या संघाचंही प्रतिनिधीत्व केलं आहे. हैदराबादविरुद्धचा सामना गमावल्यानंतर रविवारी चेन्नईसमोर पंजाबचं आव्हान आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : वय, काहींसाठी फक्त एक आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण !