News Flash

जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम टी-२० गोलंदाज !

मुंबईच्या गोलंदाजी प्रशिक्षकांनी केलं कौतुक

आयपीएलच्या तेराव्या हंगामात गतविजेत्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. दिल्लीविरुद्ध क्वालिफायर सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी बहारदार कामगिरी केली. जसप्रीत बुमराहने ४ षटकांत १ षटक निर्धाव टाकत १४ धावा देत दिल्लीच्या ४ फलंदाजांना माघारी धाडलं. मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड बुमराहच्या कामगिरीवर चांगलेच खुश झाले आहेत.

“जसप्रीत बुमराहला मैदानात सर्वोत्तम कामगिरी करताना पाहणं हा एक वेगळाच आनंद असतो. जगातला सर्वोत्तम टी-२० गोलंदाज आपल्याला नेमून दिलेलं काम अतिशय योग्य पद्धतीने करत आहे.” दिल्लीविरुद्ध सामन्यानंतर शेन बाँडने बुमराहचं कौतुक केलं. दिल्लीविरुद्ध सामन्यात बोल्टनेही २ बळी घेत बुमराहला उत्तम साथ दिली. ५७ धावांनी विजय मिळवत मुंबईने अंतिम फेरीत प्रवेश नोंदवला आहे.

दरम्यान, पहिल्या एलिमिटेटर सामन्यात हैदराबादने रंगतदार सामन्यात विराट कोहलीच्या RCB वर ६ गडी राखून मात केली. या पराभवामुळे RCB चं स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलेलं आहे. दिल्ली आणि हैदराबादचा संघ आता दुसरा क्वालिफायर सामना खेळतील, या सामन्यातील विजेता संघ अंतिम फेरीत विजेतेपदासाठी मुंबईशी लढत देणार आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : मी निकालाची फारशी चिंता करत नाही – जसप्रीत बुमराह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 11:49 am

Web Title: jasprit bumrah is worlds best t20 bowler says mi bowling coach shane bond psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 BLOG : RCB आणि विराटला नव्याने विचार करण्याची गरज !
2 “…ती एक चूक आम्हाला महागात पडली,” विराट कोहलीने व्यक्त केली खंत
3 IPL 2020 : विजेत्यासह तीन संघ होणार मालामाल; RCB ला मिळणार इतके कोटी
Just Now!
X