News Flash

IPL 2020: जोस बटलरची धमाकेदार खेळी; राहुल द्रविड, गिलक्रिस्टच्या कामगिरीशी बरोबरी

VIDEO: पाहा बटलरची झंजावाती ७० धावांची खेळी

जोस बटलर (फोटो- IPL.com)

‘करो या मरो’च्या सामन्यात चेन्नईविरूद्ध राजस्थानच्या संघाने नावाप्रमाणेच रॉयल विजय मिळवला. चेन्नईच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करत २० षटकांत फक्त १२५ धावा केल्या होत्या. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात खराब झाली. पण जोस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनी आपला अनुभव पणाला लावत सामना जिंकला. बटलरने नाबाद अर्धशतक ठोकले.

बटलरची झंजावाती खेळी-

१२६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानचा सलामीवीर बेन स्टोक्स १९ धावांवर बाद झाला. पाठोपाठ रॉबिन उथप्पा (४) आणि संजू सॅमसन (०) दोघेही झटपट बाद झाले. त्यानंतर जोस बटलर आणि स्टीव्ह स्मिथ या दोन अनुभवी खेळाडूंनी खेळपट्टीचा अंदाज घेत सावध खेळ केला. कर्णधार स्मिथने २ चौकारांच्या मदतीने नाबाद २४ धावा केल्या. पण सामनावीर ठरला जोस बटलर. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावा केल्या. हे त्याचे IPLमधील ११वे अर्धशतक ठरले. याचसोबत त्याने राहुल द्रविड, अडम गिलक्रिस्ट, स्टीव्ह स्मिथ यांच्या कामगिरीशी बरोबरी केली.

त्याआधी, नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या डावाची सुरूवात खराब झाली. सलामीवीर फाफ डु प्लेसिस १० धावांवर बाद झाला. शेन वॉटसनही ८ धावा काढून माघारी परतला. सॅम करनला चांगली सुरूवात मिळाली पण १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने २२ धावा केल्यावर तो झेलबाद झाला. चांगल्या लयीत असलेला रायडू (१३ स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रविंद्र जाडेजा यांनी अर्धशतकी भागीदारी करत संघाला शंभरी पार करून दिली. १८व्या षटकात धोनी २८ धावांवर धावचीत झाला. अखेरीस रविंद्र जाडेजा (३५*) आणि केदार जाधव (४*) या दोघांनी संघाला २० षटकांत ५ बाद १२५ धावांपर्यंत मजल मारून दिली. श्रेयस गोपालने १४ धावांत १ बळी, राहुल तेवातियाने १८ धावांत १ बळी तर जोफ्रा आर्चरने २० धावांत १ बळी टिपत भेदक मारा केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 2:00 pm

Web Title: jos buttler scores 11th fifty in ipl equals rahul dravid steve smith adam gilchrist rishabh pant ipl 2020 csk vs rr vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 BLOG : धोनीकडून पळवाट शोधण्याचा प्रयत्न??
2 CSK कात टाकणार; पुढील सामन्यांत मिळणार यंग ब्रिगेडला संधी
3 Ctrl C + Ctrl V : IPL च्या नकली गोंगाटामध्ये मुंबईतल्या इंजिनीअर्सची कामगिरी
Just Now!
X