05 March 2021

News Flash

IPL 2020: अरेरे… रबाडाच्या बाबतीत घडला हा दुर्देवी योगायोग

पाहा नक्की काय आहे प्रकरण

कगिसो रबाडा (फोटो- IPL.com)

दिल्लीविरूद्धच्या सामन्यात हैदराबादने तुफान फटकेबाजीच्या जोरावर दोनशेपार मजल मारली. डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान साहा या सलामीवीरांनी केलेली झंजावाती अर्धशतके आणि मनिष पांडेने मोक्याच्या क्षणी केलेली तडाखेबाज खेळी यांच्या बळावर हैदराबादने २० षटकात २१९ धावा ठोकल्या. हैदराबादच्या फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा पहिल्या षटकापासूनच समाचार घेतला. यंदाच्या IPLमध्ये सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या कगिसो रबाडालाही फटका बसला.

रबाडाने ४ षटकांत ५४ धावा दिल्या. हैदराबादच्या सगळ्याच फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली. महत्त्वाची बाब म्हणजे सर्वाधिक बळी मिळवणारा रबाडा आज एकही बळी मिळवू शकला नाही. तब्बल २५ सामन्यांनंतर आणि तीन वर्षानंतर रबाडावर अशी नामुष्की ओढवली. योगायोग म्हणजे ३ वर्षांपूर्वी त्याला हैदराबादविरूद्धच्या सामन्यातच विनाबळी राहावे लागले होते. रबाडाने २ मे २०१७मध्ये हैदराबाद विरूद्धच्या सामन्यात ४ षटकांत ५९ धावा दिल्या होत्या. त्यानंतर आतापर्यंतच्या २५ सामन्यात त्याने किमान १ तरी बळी मिळवला होता. पण आजच्या सामन्यात पुन्हा त्याच्या वाट्यासा हाच दुर्देवी योगायोग आला. आज पुन्हा हैदराबाद विरूद्ध त्याला एकही बळी मिळवता आला नाही.

दरम्यान, हैदराबादविरूद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. डेव्हिड वॉर्नरसोबत आलेल्या सलामीवीर वृद्धिमान साहाने संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्यानंतर ‘बर्थडे बॉय’ कर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही फटकेबाजी सुरू केली. डेव्हिड वॉर्नरने पॉवरप्लेमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. असा पराक्रम करणारा तो यंदाच्या हंगामातील पहिला खेळाडू ठरला. ३४ चेंडूत ६६ धावा करून तो माघारी परतला. साहाने मात्र फटकेबाजी सुरूच ठेवली. त्याने २७ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं, पण शतकाने त्याला हुलकावणी दिली. तो ४५ चेंडूत १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ८७ धावा करू शकला. त्यानंतर मनिष पांडे आणि केन विल्यमसन जोडीने शेवटपर्यंत खिंड लढवली. मनिष पांडेने ३१ चेंडूत ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या. तर विल्यमसनने नाबाद ११ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2020 10:19 pm

Web Title: kagiso rabada goes wicketless after 3 years 25 games unfortunate coincidence ipl 2020 dc vs srh vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: वॉर्नर, साहाचा दिल्लीला ‘जोर का झटका’; SRHची २००पार मजल
2 IPL 2020: वृद्धिमान साहाची झंझावाती खेळी; केला दुहेरी पराक्रम
3 IPL 2020 VIDEO: ‘बर्थडे बॉय’ वॉर्नरने केला कोणालाही न जमलेला विक्रम
Just Now!
X