26 October 2020

News Flash

VIDEO: पोलार्डने लगावलेला हा उत्तुंग षटकार पाहिलात का?

बाऊन्सर चेंडूचा कायरन पोलार्डने असा घेतला समाचार

क्विंटन डी-कॉकचं अर्धशतक आणि अखेरच्या षटकांमध्ये पोलार्ड, कुल्टर-नाईल जोडीने केलेली फटकेबाजी यांच्या जोरावर मुंबईने पंजाबविरुद्ध १७६ धावांचा पल्ला गाठला. मुंबईच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी चाहत्यांची निराशा केली. पण डी कॉकने एक बाजू लावून धरत अर्धशतक ठोकलं. त्यानंतर अखेरच्या फळीत पोलार्ड आणि कुल्टर नाईल जोडीने पंजाबच्या गोलंदाजांना चांगलाच दणका दिला.

कायरन पोलार्डने शेवटच्या षटकात लगावलेला उत्तुंग षटकार विशेष ठरला. २०वे षटक टाकण्यासाठी ख्रिस जॉर्डन आला. त्याने पोलार्डला पहिलाच चेंडू बाऊन्सर टाकला. त्या चेंडूवर पोलार्ड बाचकेल असा त्याचा अंदाज होता, पण पोलार्ड जागेवर उभं राहून उत्तुंग असा षटकार लगावला. त्याने मारलेला षटकार थेट स्टँड्समध्ये जाऊन पडला. त्याने ९३ मीटर लांब षटकार लगावला.

पाहा तो उत्तुंग षटकार-

दरम्यान, नाणेफेक जिंकत मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा ९ धावांवर त्रिफळाचीत झाला. सूर्यकुमार यादवही लवकर बाद झाला. चौथ्या क्रमांकावर संधी मिळालेल्या इशान किशननेही निराशा केली. एकीकडे मुंबईचे फलंदाज माघारी परतत असताना डी कॉकने एक बाजू लावून धरली. त्याने ४३ चेंडूत ३ चौकार व ३ षटकारांसह ५३ धावा केल्या. १७ व्या षटकांत मुंबईची अवस्था ६ बाद ११९ अशी झाली होती. यानंतर कायरन पोलार्ड आणि नॅथन कुल्टर-नाईल या दोघांनी २१ चेंडूत नाबाद ५७ धावांची भागीदारी केली. पोलार्डने नाबाद ३४ आणि कुल्टर नाइलने नाबाद २४ धावा केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमी, अर्शदीप सिंहने प्रत्येकी २-२ तर ख्रिस जॉर्डन आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 9:59 pm

Web Title: kieron pollard huge six video ipl 2020 mi vs kxip bouncer chris jordan watch vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : तब्बल १० वर्ष…संयमी अर्धशतकासह डी-कॉकची सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
2 VIDEO SRH vs KKR: असा रंगला Super Overचा थरार
3 IPL 2020 : सुपरओव्हरवर अपयशाची मालिका KKR कडून खंडीत
Just Now!
X