26 October 2020

News Flash

IPL 2020 : सुपरओव्हरवर अपयशाची मालिका KKR कडून खंडीत

IPL च्या इतिहासात KKR सुपरओव्हरवर पहिल्यांदाच विजयी

निर्धारित वेळेत कोलकाता विरुद्ध हैदराबाद यांच्यातील सामना बरोबरीत सुटल्यामुळे अबु धाबीच्या मैदानावर सुपरओव्हरवर सामन्याचा निकाल लावण्यात आला. कोलकात्याने २० षटकांत १६३ धावांचा पल्ला गाठला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादने सामना बरोबरीत सोडवला. त्यानंतर झालेल्या सुपर ओव्हरमध्ये IPL 2020 चा पहिलाच सामना खेळणाऱ्या लॉकी फर्ग्युसनने केवळ २ धावा देत २ बळी घेऊन हैदराबादचा डाव संपवला. यानंतर मॉर्गन-दिनेश कार्तिक जोडीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

या विजयासह KKR ने आयपीएलच्या इतिहासात सुररओव्हरवर अपयशी ठरण्याची आपली मालिका खंडीत केली आहे. आतापर्यंतच्या इतिहासात कोलकाता नाईट रायडर्सने ३ वेळा सुपरओव्हर खेळल्या होत्या…पण या तिन्ही सामन्यांमध्ये KKR ला पराभवाचा सामना करावा लागला होता. KKR चा सुपरओव्हरवरचा हा पहिलाच विजय ठरला आहे.

१६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर केन विल्यमसन आणि बेअरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी केली. विल्यमसन २९ धावांवर बाद झाला. क्रमवारीत वर आलेला प्रियम गर्गदेखील ४ धावावर माघारी गेला. जॉनी बेअरस्टोने चांगली सुरूवात केली होती. पण तो ३६ धावा काढून बाद झाला. मधल्या फळीतील मनिष पांडे (६) आणि विजय शंकरने (७) संघाची निराशा केली. नवख्या अब्दुल समदने १५ चेंडूत २३ धावा करत हैदराबादसाठी विजयाच्या आशा जागवल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तीन चौकार ठोकले पण सामना बरोबरीत सुटला. वॉर्नरने ५ चौकारांसह नाबाद ४७ धावा केल्या. IPL 2020चा पहिलाच सामना खेळणाऱ्या फर्ग्युसनने १५ धावांत ३ बळी टिपले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 8:32 pm

Web Title: kkr win their first match on super over in ipl history psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: फर्ग्युसनच्या माऱ्यापुढे हैदराबाद ‘लॉक’; कोलकाताचा ‘सुपर’ विजय
2 IPL 2020 : दोन सुपरओव्हर्सचा थरार पंजाबने जिंकला, मुंबई इंडियन्स पराभूत
3 VIDEO: अजब गजब सिक्सर! विल्यमसनचा फटका पाहून कार्तिक, मॉर्गनही अवाक
Just Now!
X