News Flash

KKR च्या पहिल्या विजयावर शाहरुख खुश; संघातील युवा खेळाडूंना दिला ‘हा’ संदेश

IPL 2020 : जितबो रे… कोलकाताची हैदराबादवर ७ गडी राखून मात

युवा शुबमन गिलची फटकेबाजी आणि अनुभवी मॉर्गनने त्याला दिलेली उत्तम साथ या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात पहिल्या विजयाची नोंद केली. अबु धाबीच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादवर ७ गडी राखून मात करत कोलकात्याने आपल्या विजयाचं खातं उघडलं. KKRने मिळवलेल्या या पहिल्या विजयावर शाहरुख खान याने आनंद व्यक्त केला. त्याने ट्विटच्या माध्यमातून संघातील युवा खेळाडूंना खास संदेश दिला आहे.

“संघातील सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत पहिला विजय मिळवला. या जबरदस्त कामगीरीसाठी सर्वांचं मनापासून अभिनंदन. शुबमन गिल, नितिश राणा, शिवम मावी आणि नारगकोट्टी तुम्ही तदुरुस्त राहा. स्वत:ची काळजी घ्या. KKR कुटुंबात तुमचं स्वागत आहे.” अशा आशयाचं ट्विट करुन KKRचा मालक शाहरुख खान याने पहिल्या विजयासाठी संघाचं अभिनंदन केलं. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

हैदराबादने विजयासाठी दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवातही खराब झाली होती. सलामीवीर सुनील नरिन एकही धाव न काढता माघारी परतला. यानंतर नितीश राणा आणि गिल यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतू राणाही फटकेबाजी करताना बाद झाला. कर्णधार दिनेश कार्तिकला राशिद खानने शून्यावर बाद करत कोलकात्याला तिसरा धक्का दिला. यानंतर मैदानात आलेल्या मॉर्गनने गिलला सुंदर साथ देत अधिक पडझड होणार नाही याची काळजी घेतली. गिलने यादरम्यान मैदानात सुरेख फटकेबाजी करत आपलं अर्धशतक साजरं केलं. मधल्या षटकांत हैदराबादच्या गोलंदाजांनी सुरेख मारा करत कोलकात्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला खरा…पण त्यांचे प्रयत्न फोल ठरले. हैदराबादकडून खलिल अहमद, नटराजन आणि राशिद खान यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:44 pm

Web Title: kolkata knight riders shah rukh khan tweet viral kkr vs srh ipl 2020 mppg 94
Next Stories
1 CSK vs DC : सामन्याआधी वॉटसनच्या आजीचे झालं निधन
2 IPL 2020 : शारजात आज पुन्हा षटकारांचा पाऊस?
3 IPL 2020 : दिनेश कार्तिक शून्यावर माघारी, हैदराबादविरुद्ध नकोशा विक्रमाची नोंद
Just Now!
X