News Flash

“केस काळे करुन कोणी तरुण होत नाही, निवृत्ती घे”; अभिनेत्याचा धोनीला सल्ला

धोनीची झुंज अपयशी; रंगतदार सामन्यात सनराईजर्स हैदराबादची बाजी

आयपीएलच्या तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या खराब कामगिरीचं सत्र सुरुच आहे. दुबईच्या मैदानावर झालेल्या सामन्यात सनराईजर्स हैदराबादने चेन्नई सुपरकिंग्जवर ७ धावांनी मात केली. तेराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवाची ही हॅटट्रीक ठरली आहे. दरम्यान या सामन्यावर अभिनेता कमाल आर. खान याने प्रतिक्रिया दिली. चेन्नई सुपरकिंग्जच्या पराभवासाठी त्याने धोनीला जबाबदार धरलं आहे. “केस काळे करुन कोणी तरुण होत नाही, जमत नसेल तर निवृत्ती घे” असा उपरोधिक टोला त्याने धोनीला लगावला आहे.

अवश्य पाहा – कोटी कोटींची उड्डाणे… ‘बिग बॉस’च्या आशीर्वादाने करोडपती झालेले सेलिब्रिटी

१६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धोनीने अखेरच्या षटकांमध्ये केलेल्या फटकेबाजीमुळे सामन्यात रंगत निर्माण झाली. परंतू त्याचे प्रयत्न तोकडेच पडले. फलंदाजीदरम्यान उष्ण वातावरणामुळे आलेला थकवा आणि धापा टाकणारा धोनी हे चित्र सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं. या चित्राच्या पार्श्वभूमीवर कमाल आर खान उर्फ केआरकेने धोनीवर टीका केली आहे.

अवश्य पाहा – युपी पोलिसांनी राहुल गांधींवर केलेल्या लाठीचार्जवर स्वरा भास्कर संतापली, म्हणाली…

“मित्रा, केस काळे करुन कोणी तरुण होत नाही. २ धावा काढतानाही तुला धाप लागत होती. वय वाढल्यानंतर असा त्रास सर्वांनाच होतो. पण म्हातारपणी असा अपमान करुन घेणं तुला चांगलं वाटतंय का? आम्ही तुझे फॅन आहोत, तुझी अशी अवस्था पाहून आम्हाला खुप दु:ख होतंय. त्यामुळे कृपया आता तू निवृत्ती स्विकार.” अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेने धोनीला उपरोधिक टोला लगावला आहे. वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या केआरकेचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 3:11 pm

Web Title: m s dhoni csk vs srh ipl 2020 kamaal r khan mppg 94
Next Stories
1 IPL 2020 : खूप प्रयत्न केला पण….सलग तिसऱ्या पराभवानंतर धोनीचे हताश उद्गार
2 IPL 2020 : वय, काहींसाठी फक्त एक आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण !
3 IPL 2020 : राजस्थान रॉयल्ससाठी आनंदाची बातमी ! बेन स्टोक्स युएईला रवाना
Just Now!
X