सलामीवीर देवदत पडीकल आणि एबी डिव्हीलियर्सच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर आरसीबीनं निर्धारित २० षटकांत १६३ धावांपर्यंत मजल मारली आहे. १६४ धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार डेविड वॉर्नर स्वस्तात बाद झाला. सामन्याच्या दुसऱ्याच षटकात वॉर्नर धावबाद झाला. उमेश यादवच्या गोलंदाजीवर बेअरस्टोने सरळ फटका मारला. पण चेंडू उमेश यादवच्या हाताला लागून सरळ स्टम्पवर आदलळा. त्यावेळी दुसऱ्या बाजूला असणाऱ्या वॉर्नर पीचच्या बाहेर आला होता. त्यामुळे पंचांनी वॉर्नला धावबाद दिलं. वॉर्नर फक्त सहा धावांवर विचित्र पद्धतीने धावबाद झाला.

खराब सुरुवातीनंतर बेयरस्टो आणि मनीष पांडेनं संघाचा डाव सांभाळला आहे. वॉर्नर बाद झाला तेव्हा संघाची धावसंख्या फक्त १८ होती. ९ षटकांनतर हैदराबाद संघाची धावसंख्या एक बाद ७२ झाली आहे. आरसीबीचे यादव आणि स्टेन हे दोन्ही वेगवान गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले आहेत. चांगल्या सुरुवातीनंतरही सामन्यावरील पकड जात आहे.

दरम्यान,  सलामीवीर देवदत पडीकल आणि फिंच यांनी पहिल्या विकेटसाठी केलेल्या ९० धावांच्या भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पहिल्या सामन्यात १६३ धावा केल्या आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा डेव्हिड वॉर्नरचा निर्णय काहीसा फसला. पदार्पणाचा आयपीएल सामना खेळणाऱ्या देवदत पडीकलने फिंचच्या साथीने हैदराबादच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पडीकलने पहिल्याच सामन्यात अर्धशतकी खेळी करत संघाला चांगली सुरुवात दिली. परंतू सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर RCB च्या मधल्या फळीने निराशा केल्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. पडीकल आणि डिव्हीलियर्स यांनी सामन्यात अर्धशतकं झळकावली.