News Flash

MI vs RCB Dream 11 Team Prediction : या खेळाडूंना द्या टीममध्ये जागा, होईल फायदा

अशी तयार करू शकता MI vs RCB ची Dream 11 टीम, पाहा संपूर्ण यादी

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) आज, सोमवारी गतविजेता मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात लढत होणार आहे. बंगळुरुने यंदाच्या ‘आयपीएल’चा दिमाखदार प्रारंभ केला. परंतु किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध तारांकित फलंदाजीची फळी कोसळल्यामुळे आणि वेगवान गोलंदाज महागडे ठरल्यामुळे त्यांना ९७ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला.

काय आहे दोन्ही संघाची स्थिती?
बंगळुरुच्या गोलंदाजीची भिस्त यजुवेंद्र चहलवर आहे. वेगवान माऱ्यातील नवदीप सैनी, डेल स्टेन आणि आणि उमेश यादव महागडे ठरत आहेत. स्टेनचे स्थान जरी टिकले तरी यादवऐवजी मोहम्मद सिराजचा पर्याय वापरला जाऊ शकतो. इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अलीसुद्धा संधीच्या प्रतीक्षेत आहे. पहिल्या दोन सामन्यांत दुखापतीमुळे अष्टपैलू ख्रिस मॉरिस खेळू शकला नाही. गेल्या सामन्यात विजयी लय राखणाऱ्या मुंबईच्या संघात फारसे बदल होण्याची शक्यता नाही.

कोलकाता नाइट रायडर्सविरुद्धच्या विजयात सर्व आघाडय़ांवर यश मिळाल्याने मुंबई इंडियन्सच्या संघरचनेत बदल होण्याची शक्यता कमी आहे. पण सौरभ तिवारीच्या जागी इशन किशनचा समावेश होण्याची शक्यता आहे. कर्णधार रोहित शर्माला सूर गवसल्याने मुंबईची मुख्य चिंता मिटली आहे. सूर्यकुमार यादवनेही अप्रतिम फलंदाजी के ली. धडाकेबाज फलंदाज हार्दिक पंडय़ा आणि किरॉन पोलार्ड आवश्यकतेनुसार गोलंदाजीचा भारही समर्थपणे सांभाळत आहेत.

काय सांगतात आकडे?
बंगळुरु आणि मुंबई आतापर्यंत २५ वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी १६ वेळा मुंबईच्या संघाने बाजी मारली आहे. तर फक्त ९ वेळा आरसीबीचा विजय झाला आहे.

अशी असू शकते ड्रीम इलेव्हन टीम

विकेट किपर – क्विंटन डी कॉक

फलंदाज – रोहित शर्मा (कर्णधार), सुर्यकुमार यादव, ए बी डिव्हिलिअर्स (उप कर्णधार) आणि अॅरॉन फिंच

अष्टपैलू – हार्दिक पांड्या, शिवम दुबे

गोलंदाज – बुमराह, चहर, चहल, जेम्स पॅटिनसन

(ही टीम खेळाडूंच्या कामगिरीनुसार अंदाजे आहे, यात तुम्ही तुमच्या पद्धतीने बदल करू शकता. )

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2020 4:15 pm

Web Title: mi vs rcb dream 11 team prediction nck 90
टॅग : IPL 2020
Next Stories
1 “मला कोणी सांगू शकेल का?, हा सॅमसन नावाचा गृहस्थ नक्की…”; आनंद महिंद्रांनाही पडला प्रश्न
2 IPL 2020 : मुंबईविरुद्ध सामन्यात RCB ख्रिस मॉरिसशिवाय मैदानात उतरणार !
3 IPL 2020 : सचिन तेंडुलकरने सांगितलं पंजाबच्या पराभवाचं कारण, म्हणाला…
Just Now!
X