30 November 2020

News Flash

IPL 2020: धोनीच्या खराब कामगिरीवर गांगुली म्हणतो…

३ सामन्यात मिळून धोनीच्या ४४ धावा

IPL 2020: धोनीच्या खराब कामगिरीवर गांगुली म्हणतो... (फोटो- IPL.com)

IPL 2020 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज संघाला तीनपैकी दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्ज संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं. IPL 2020मधील हा त्यांचा सलग दुसरा पराभव ठरला. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईवर ४४ धावांनी मात केली. विजयासाठी दिलेल्या १७६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईला ७ गड्यांच्या मोबदल्यात फक्त १३१ धावाच करता आल्या. सलग दुसऱ्या पराभवानंतर धोनीवर टीका झाली. त्यानंतर आता BCCI अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीबाबात वक्तव्य केलं आहे.

राजस्थानविरूद्धच्या सामन्याप्रमाणेच दिल्लीविरूद्धच्या सामन्यातही कर्णधार महेंद्रसिंग धोनी अपेक्षेपेक्षा उशीरा फलंदाजीला आला आणि त्याचा फटका चेन्नईला बसला. धोनीने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला पण १२ चेंडूत केवळ २ चौकार लगावत तो १५ धावांवर माघारी परतला. धोनीने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यात केवळ ४४ धावा केल्या आहेत. त्यामुळे धोनीच्या खराब फलंदाजीवर टीका करण्यात येत आहे. अशा वेळी गांगुलीने धोनीबद्दल मत व्यक्त केलं आहे.

“सध्याच्या परिस्थितीत धोनीला जुन्या लयीत परतण्यासाठी वेळ लागणं स्वाभाविक आहे. धोनी जवळपास दीड वर्षांच्या विश्रांतीनंतर क्रिकेटच्या मैदानावर उतरला आहे. तुम्ही कितीही दमदार फलंदाज असलात तरी अशा परिस्थितीत लयीत परतणं सोपं नसतं. थोडा वेळ वाट पाहावीच लागते. जेव्हा धोनी सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता तेव्हा मी समालोचन कक्षात बसायचो. मी तेव्हाच म्हटलं होतं की धोनीने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी. पण सध्या परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे धोनीला त्याचा वेळ द्यायला हवा”, असं गांगुली म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2020 4:42 pm

Web Title: ms dhoni bad form batting bcci president sourav ganguly reaction ipl 2020 vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: मुंबई-बंगळुरू सामन्यावर सचिनचं मोजक्या शब्दांत भाष्य, म्हणाला…
2 एका गरोदर महिलेसाठी…; RCB च्या थरारक विजयावर अनुष्कानं केलं कौतुक
3 IPL 2020 : मुंबईवरील विजयानंतर आनंद व्यक्त करणारी RCB च्या जर्सीतील ती तरुणी नक्की आहे तरी कोण?
Just Now!
X