चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीसाठी यंदाचे आयपीएल फारसे छान गेले नाही. या आयपीएलमध्ये धोनीच्या नेतृत्वापासून त्याच्या वयापर्यंत आणि फलंदाजीपर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. मात्र धोनी हा जगभरातील सर्व क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू असल्याचेही ऑगस्ट महिन्यात त्याने निवृत्ती घेतल्यानंतर पाहायला मिळालं. निवृत्तीनंतरच्या पहिल्याच आयपीएलमध्ये धोनीला फारशी चांगली कामगिरी करता आली नसली तरी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार असल्याचा मान त्यांच्याच नावावर आहे. संघ आयपीएलमधून बाहेर पडला असला तरी धोनीच्या चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ जराही कमी झालेली नाही.
धोनीच्या अशाच एका चहात्याने त्याचे संपूर्ण घरच खास धोनी थीमने रंगवलं आहे. .तामिळनाडूच्या अरंगुर येथील गोपी क्रिश्नन आणि त्याचे कुटुंबीय चेन्नई सुपरकिंग्जवरील प्रेमासाठी ओळखले जातात. गोपी क्रिश्नन आणि त्याच्या कुटुंबातील सर्वच सदस्य चेन्नईच्या संघाचे जबरा फॅन आहेत. याचसाठी त्यांनी आपलं घरंही चेन्नई सुपरकिंग्जची ओळख असलेल्या पिवळ्या रंगात रंगवून घेतलं आहे. तसंच त्यांनी आपल्या घराला Home of Dhoni Fan असं नावं दिलंय. हेच घर पाहून धोनीने आता पतिक्रिया दिली असून चाहत्यांच्या एवढ्या प्रेमासाठी त्याने गोपी क्रिश्चन यांचे आभार मानले आहेत. चेन्नई सुपर किंग्सच्या अधिकृत सोशल नेटवर्किंग हॅण्डलवरुन या घराबद्दलची धोनीची पहिली प्रतिक्रिया पोस्ट करण्यात आली आहे. “मी हे फोटो इन्स्ताग्रामवर पाहिले. हे खूप छान आहे. त्यावेळी ते वेळ माझे चाहते नसून ते सीएसकेचे मोठे चाहते असल्याचेही घराकडे पाहिल्यावर दिसून येतं,” असं धोनी म्हणाला आहे.
प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार धोनीच्या चाहत्याला हे घर रंगवण्यासाठी दीड लाख रुपये खर्च आला आहे. धोनीचा हा चाहता त्याच्या या घरामुळे सोशल मीडियावर रातोरात स्टार झाला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 27, 2020 3:15 pm