आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला आयपीएलमध्ये फलंदाजी करताना पहायला मिळेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. परंतू आतापर्यंत झालेल्या सामन्यांत धोनी फलंदाजीसाठी उशीरा आल्यामुळे चाहत्यांची चांगलीच निराशा झाली. सलामीच्या सामन्यात अंबाती रायुडूच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर चेन्नईने सामन्यात बाजी मारली. मात्र यानंतर रायुडू दुखापतग्रस्त झाल्यानंतर चेन्नईची दिल्ली आणि राजस्थानविरोधात तारांबळ उडाली. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या चेन्नई संघाला भारतीय संघाचा माजी अष्टपैलू इरफान पठाणने एक मोलाचा सल्ला दिला आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : CSK च्या खेळाडूने Bio Secure Bubble मोडलं?? संघाचे CEO म्हणतात…

“आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदा मला चेन्नईचा संघ समतोल वाटत नाहीये. स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच त्यांच्या संघात समस्या सुरु झाल्या होत्या. रैनाने माघार घेतली आणि त्यानंतर चेन्नईने त्याच्या बदली इतर खेळाडूला संघात स्थान दिलं नाही. जर सुरेश रैना CSK मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असता तर त्यांना संघात एक गोलंदाज खेळवण्याची संधी मिळाली असती. सध्या ते ५ गोलंदाज घेऊन खेळतायत, त्यात धोनी केदार जाधवकडून गोलंदाजी करवून घेत नाही हा देखील एक चिंतेचा विषय आहे. एक अतिरीक्त गोलंदाज घेऊन खेळणाऱ्या संघाचं पारडं नेहमी जड असतं. याचसोबत धोनीने किमान १० षटकं खेळावी असं पहावं. तो सर्वोत्तम फिनीशर आहे.” इरफान Star Sports वाहिनीच्या Cricket Connected कार्यक्रमात बोलत होता.

अवश्य वाचा – RR vs KKR : उथप्पाने नियम मोडला, चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर

दरम्यान आठवडाभराच्या विश्रांतीनंतर CSK समोर सनराईजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – Video : त्याचा विचार नको करु ! श्रीरामपूरचा झहीर आणि बीडचा दिग्वीजय जेव्हा युएईत मराठीत बोलतात