News Flash

“माही भाई, सलाम!”; धोनीसाठी वेगवान गोलंदाजानं केलं ट्विट

धोनीने केली नाबाद ४७ धावांची खेळी

चेन्नईसाठी IPL 2020ची सुरूवात दणक्यात झाली खरी पण त्यानंतर सलग तीन सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान आणि दिल्लीपाठोपाठ सनरायजर्स हैदराबादनेही चेन्नईला पाणी पाजलं. रोमांचक सामन्यात हैदराबादने चेन्नईवर ७ धावांनी मात केली. १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने खराब सुरूवात केली होती, पण धोनीने फटकेबाजी करत सामन्यातील रंगत टिकवून ठेवली. दुर्दैवाने शेवटच्या दोन षटकात आवश्यक फटकेबाजी न करता आल्याने चेन्नईचा पराभव झाला. सामन्यात दुहेरी धावा घेताना धोनी प्रचंड थकलेला दिसला. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. याचदरम्यान, एका वेगवान गोलंदाजाने धोनीला सलाम केला.

“धोनी भाई, सलाम! (या वयातही) अतिशय उष्ण वातावरणात २० षटकं किपिंग करायची आणि नंतर इतक्या जलदगतीने धावा घ्यायच्या ही काही सोपी गोष्ट नाही. तुमच्या याच गोष्टीमुळे तुमचा आदर करावासा वाटतो. दडपणाच्या आणि कठीण प्रसंगात धीर सोडणं यालाच म्हणतात. संघासाठी आणि क्रिकेटसाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या खेळाडूला (धोनीला) सलाम!”, असं ट्विट करत वेगवान गोलंदाज एस श्रीसंत याने आपल्या भावना व्यक्त केल्या.

चेन्नईने टिच्चून मारा करत हैदराबादला प्रथम फलंदाजी करताना १६४ धावांवर रोखलं. वॉर्नर, बेअरस्टो, मनिष पांडे, विल्यमसन हे हैदराबादचे महत्वाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे संघ पिछाडीवर गेला होता. पण प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मा या युवा फलंदाजांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत संघाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा गाठून दिला. हैदराबादकडून प्रियम गर्गने सर्वाधिक नाबाद ५१ धावा केल्या. १६५ धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. शेन वॉटसन, रायडू, फाफ डु-प्लेसिस, केदार जाधव सारे अपयशी ठरले. यानंतर मैदानावर आलेल्या रविंद्र जाडेजा आणि महेंद्रसिंह धोनीने भागीदारी करत संघाचा डाव सावरला. पाचव्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी ७२ धावांची भागीदारी करत संघाचं आव्हान कायम राखलं. पण अखेरच्या षटकांत आवश्यक ती फटकेबाजी न करता आल्याने त्यांना पराभूत व्हावं लागलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2020 4:28 pm

Web Title: ms dhoni superb knock tired phase photo viral ipl 2020 csk vs srh pacer sreesanth reaction salute tweet vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 “केस काळे करुन कोणी तरुण होत नाही, निवृत्ती घे”; अभिनेत्याचा धोनीला सल्ला
2 IPL 2020 : खूप प्रयत्न केला पण….सलग तिसऱ्या पराभवानंतर धोनीचे हताश उद्गार
3 IPL 2020 : वय, काहींसाठी फक्त एक आकडा तर काहींसाठी संघातून स्थान गमावण्याचं कारण !
Just Now!
X