News Flash

IPL 2020: रैनाची माघार पडली धोनीच्या पथ्यावर, कारण…

तुम्हाला माहिती आहे का 'हे' कारण

राजस्थानविरूद्धच्या सामन्यात चेन्नईला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. चेन्नईच्या फलंदाजांना राजस्थानच्या भेदक माऱ्यापुढे केवळ १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली. १२६ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानने ३ गडी लवकर गमावले होते, पण जोस बटलर आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ या दोघांनी आपला अनुभव पणाला लावत संघाला सहज विजय मिळवून दिला.

चेन्नईच्या या पराभवानंतर सुरेश रैनाने पुनरागमन करावं अशी जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. रैनाने या स्पर्धेतून घेतलेल्या माघारीमुळे CSKला फटका बसला, पण रैनाचा हा निर्णय कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या मात्र पथ्यावर पडला. राजस्थानविरूद्धचा सामना हा धोनीचा २००वा IPL सामना होता. असा पराक्रम करणारा धोनी पहिला खेळाडू ठरला. स्पर्धा सुरू झाली तेव्हा धोनीने १९० सामने खेळले होते, तर सुरेश रैना १९३ सामन्यांसह आघाडीवर होता. जर रैनाने स्पर्धेतून माघार घेतली नसती तर IPLमध्ये २०० सामने खेळणारा पहिला खेळाडू बनण्याचा मान सुरेश रैनाला मिळाला असता. या आधी ५०वा, १००वा आणि १५०वा IPL खेळणारा पहिला खेळाडू बनण्याचा मानही रैनालाच मिळाला होता, पण स्पर्धेतून माघार घेतल्याने रैनाचा २०० सामन्यांचा मान हुकला.

फोटो ट्विट करत रैनाला दिल्या धोनीला शुभेच्छा

 

राजस्थान विरूद्ध चेन्नई सामन्याआधी सुरेश रैनाने धोनीसोबतचा एक फोटो पोस्ट केला. राजस्थानविरूद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीचा IPL स्पर्धेतील २००वा सामना ठरला. IPL स्पर्धेत २०० सामने खेळण्याचा इतिहास धोनीने रचला. हेच औचित्य साधून रैनाने फोटो पोस्ट केला. “IPL स्पर्धेत २०० सामने खेळणारा पहिलावहिला खेळाडू… महेंद्रसिंग धोनी. आजच्या सामन्यासाठी तुला शुभेच्छा. भाई, असाच यशस्वी होत राहा. तुझा आम्हाला कायम अभिमान असेल”, असं ट्विट रैनाने केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 4:39 pm

Web Title: ms dhoni suresh raina rift fight pulled out of ipl 2020 captain cool 200 first to play ipl matches vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 VIDEO: धोनीला पाहून स्मिथने पायाने उडवला चेंडू अन्…
2 IPL 2020: जोस बटलरची धमाकेदार खेळी; राहुल द्रविड, गिलक्रिस्टच्या कामगिरीशी बरोबरी
3 BLOG : धोनीकडून पळवाट शोधण्याचा प्रयत्न??
Just Now!
X