05 March 2021

News Flash

दुनिया हिला देंगें….मुंबईचं प्ले-ऑफमधील स्थान जवळपास पक्कं

आरसीबीचा मोठा पराभव

जसप्रीत बुमराहाच्या भेदक गोलंदाजीला सुर्यकुमार यादवच्या दमदार खेळीची साथ लाभल्यामुळे मुंबई इंडियन्सने आरसीबीचा पाच गड्यांनी पराभव केला. या विजयासह मुंबईच्या संघाचं प्ले ऑफमधील स्थान जवळपास पक्क झालं आहे.  बुमराहने १४ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले तर सुर्यकुमार यादवने ७९ धावांची नाबाद खेळी केली.

बुमराह आणि यादवच्या नेत्रदिपक कामगिरीच्या बळावर मुंबईनं आरसीबीचा पराभव केला. या विजयासह मुंबईनं जवळपास प्लेऑपच तिकिट पक्कं केलं आहे. यंदाच्या हंगमात प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणारा मुंबईचा संघ पहिला आहे. एखादा चमत्कारचं मुंबईला प्ले ऑफमधून बाहेर काढू शकतो. जर पुढील दोन्ही सामन्यात मुंबईचा २०० किंवा त्यापेक्षा जास्त धावांनी पराभव झाला आणि कोलकाता नाइट राइडर्सने उर्वरीत दोन सामने १८५ धावांच्या अंतरानं जिंकले तेव्हाच कोलकाताचा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला होईल. सध्या केकेआरचा नेट रन रेट (-0.479) खूप खराब आहे.

मुंबई इंडियन्स संघानं १२ सामन्यात ८ विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे. १६ गुणांसह मुंबई गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. आरसीबीचे १२ सामन्यात १४ गुण असून दुसऱ्या क्रमांकावर आहे. दिल्लीचेही १४ गुण असून दिसऱ्या स्थानावर आहे. नेट रनरेट कमी असल्यामुळे दिल्ली तिसऱ्या स्थानावर आहे. किंग्स इलेवन पंजाब आणि कोलकाता नाइट राइडर्स यांचे प्रत्येकी १२ सामन्यात १२ – १२ गुण आहेत. आरसीबीला प्ले-ऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी एक विजय आवशक आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबने अनपेक्षित भरारी घेत सलग पाच सामने जिंकल्याने चौथ्या स्थानाची शर्यत अधिक चुरशीची झाली आहे. पंजाब व्यतिरिक्त राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद हे संघ मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावत असल्याने गुणतालिकेतील वरच्या क्रमांकावरील संघांच्या चिंतेत भर पडली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 9:48 am

Web Title: mumbai indians reach play off ipl 2020 nck 90
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : चेन्नईविरुद्ध कोलकाताला विजय अनिवार्य
2 RCB विरुद्ध सूर्यकुमारच्या खेळीने प्रभावित झाले शास्त्री गुरुजी, म्हणाले संयम ठेव…!
3 Video : मी आहे ना ! मैदानातील ‘त्या’ राड्यानंतर सूर्यकुमारने हार्दिकला केलं शांत
Just Now!
X