24 November 2020

News Flash

MI vs CSK: मुंबईचा ‘पॉवर-प्ले’! केला धमाकेदार विक्रम

बुमराह, बोल्टच्या माऱ्यापुढे धोनीच्या चेन्नईचं लोटांगण

मुंबई आणि चेन्नई यांच्यात यंदाच्या हंगामातील दुसरा सामना खेळण्यात आला. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांची धूळधाण उडाली. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या वेगवाना गोलंदाजांच्या जोडीपुढे चेन्नईच्या फलंदाजांनी अक्षरश: गुडघे टेकले. पॉवरप्लेच्या पहिल्या ६ षटकांत चेन्नईचा निम्मा संघ गारद झाला. याचसोबत चेन्नईचा संघ IPL च्या इतिहासात पॉवरप्लेच्या षटकांमध्ये सर्वात कमी धावा करणारा संघ ठरला. याआधी कोची टस्कर्स संघाने सर्वात कमी २९ धावा केल्या होत्या, पण चेन्नईला पहिल्या ६ षटकांत केवळ २४ धावांच करता आल्या. त्यामुळे पहिल्या ६ षटकांत सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम मुंबईच्या गोलंदाजांनी केला.

प्रथम फलंदाजी करताना चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर भोपळाही न फोडता पायचीत झाला. सामन्याच्या दुसऱ्यात षटकात जसप्रीत बुमराहने भेदक मारा करत २ चेंडूत २ बळी टिपले. अंबाती रायडू २ धावांवर तर जगदीशन शून्यावर माघारी परतला. स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा फाफ डु प्लेसिसही स्वस्तात बाद झाला. बोल्टने त्याला एका धावेवर माघारी धाडलं. अष्टपैलू रविंद्र जाडेजा गोलंदाजीवर आक्रमण करण्याच्या प्रयत्नात ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे २१ धावांत चेन्नईचा निम्मा संघ माघारी तंबूत परतला. त्यामुळे पॉवरप्ले संपल्यावर चेन्नईच्या संघाची अवस्था ५ बाद २४ अशी होती. पॉवरप्लेमध्ये ट्रेंट बोल्टने ३ तर बुमराहने २ बळी घेतले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2020 9:03 pm

Web Title: mumbai indians super bowling jasprit bumrah trent boult destroys csk batting faf du plessis ravindra jadeja ambati rayudu ms dhoni vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : दुर्दैवी योगायोग आणि धोनीच्या अपयशाची मालिका सुरुच
2 IPL 2020 : मुंबईविरुद्ध CSK ची आघाडीची फळी सपशेल फेल, नावावर नकोशा विक्रमाची नोंद
3 IPL 2020 : रोहित शर्माची दुखापत कितपत गंभीर?? मुंबई इंडियन्सने दिली माहिती
Just Now!
X