सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराहने केलेल्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने अबु धाबीच्या मैदानावर RCB वर ५ गडी राखून मात केली. हा सामना जेवढा खेळाडूंच्या बहारदार कामगिरीमुळे लक्षात राहिला तेवढात तो दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये मैदानात जुंपलेल्या राड्यामुळेही लक्षात राहिला. बंगळुरुने विजयासाठी दिलेल्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हा प्रकार घडला. डेल स्टेन टाकत असलेल्या १३ व्या षटकात सूर्यकुमारने चौकार लगावला. यानंतर शेवटच्या चेंडूवर कव्हर्सच्या दिशेने खेळलेला सूर्यकुमारचा फटका विराटने अडवला. अथक प्रयत्न करुनही सूर्यकुमारची विकेट मिळत नसल्यामुळे विराटने यावेळी सूर्यकुमारच्या दिशेने चालत जाऊन काहीही न बोलता त्याला खुन्नस देत दडपण आणण्याचा प्रयत्न केला. परंतू सूर्यकुमारही आपली नजर न हटवता नंतर आपल्या खास अंदाजात विराटकडे दुर्लक्ष करत नॉन स्ट्राईक एंडला चालत गेला.

अवश्य वाचा – Video : मी आहे ना ! मैदानातील ‘त्या’ राड्यानंतर सूर्यकुमारने हार्दिकला केलं शांत

suryakumar yadav
सूर्यकुमार यादव तंदुरुस्त; दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या सरावात सहभागी
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
IPL 2024 CSK vs GT Predicted Playing 11 Pitch Report details in Marathi
IPL 2024, SRH vs MI: हार्दिकच्या मुंबईसमोर पॅट कमिन्सच्या हैदराबादचे आव्हान, वाचा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
Virat Kohli broke Shikhar Dhawan's half century record
IPL 2024 : होळीच्या दिवशी किंग कोहलीने केली विक्रमांची उधळण! गब्बरला मागे टाकत माहीच्या विक्रमाशी साधली बरोबरी

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी विराटविरोधात आपली नाराजी व्यक्त केली. संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावरही नाराजीचे भाव दिसत होते. मुंबई इंडियन्सने विराटच्या याच जखमेवर मीठ चोळत दोन्ही खेळाडूंमध्ये रंगलेल्या द्वंद्वाचा फोटो भन्नाट कॅप्शन देऊन पोस्ट केलाय.

गेल्या काही हंगामांपासून फॉर्मात असलेल्या सूर्यकुमार यादवला यंदा भारतीय संघात स्थान मिळेल अशी आशा होती. परंतू सुनिल जोशी यांच्या निवड समितीने पुन्हा एकदा सूर्यकुमारच्या नावाचा विचार न करता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी संघ जाहीर केला. ज्यामुळे अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.

अवश्य वाचा – RCB विरुद्ध सूर्यकुमारच्या खेळीने प्रभावित झाले शास्त्री गुरुजी, म्हणाले संयम ठेव…!