News Flash

Video : सरावादरम्यान धोनीने मारलेला सिक्स थेट मैदानाबाहेर, मुरली विजयही झाला अवाक

सलामीच्या सामन्यासाठी CSK सज्ज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आता आयपीएलवर आपलं लक्ष केंद्रीत करणार आहे. १९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला युएईत सुरुवात होणार आहे. चेन्नईसमोर सलामीच्या सामन्यात गतविजेत्या मुंबई इंडियन्सचं आव्हान असणार आहे. या सामन्यासाठी चेन्नईचा संघ सध्या कसून सराव करतोय. काही दिवसांपूर्वी संघातील दोन खेळाडूंना करोनाची लागण झाल्यामुळे संघातील खेळाडूंचा क्वारंटाइन कालावधी वाढवण्यात आला होता. महेंद्रसिंह धोनीने या सरावादरम्यान आपल्या फलंदाजीची झलक पुन्हा एकदा दाखवून दिली.

अवश्य वाचा – Video : DRS घेत नाहीये, चिंता करु नको ! धोनी जेव्हा आपल्याच सहकाऱ्याची मस्करी करतो

चेन्नई सुपरकिंग्जने या सरावसत्राचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. ज्यात धोनीने मारलेला सिक्स हा थेट मैदानाबाहेर गेला. धोनीचा हा फटका पाहून संघातील खेळाडू मुरली विजयच्या चेहऱ्यावरचे हावभाव हे पाहण्यासारखे होते. पाहा हा व्हिडीओ…

२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर वर्षभरासाठी संघाबाहेर होता. त्याचे अनेक चाहते आगामी टी-२० विश्वचषकासाठी धोनी संघात पुनरागमन करेल या आशेवर होते. परंतू करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे धोनीचं पुनरागमन लांबणीवर पडलं. अखेरीस १५ ऑगस्टच्या संध्याकाळी धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली.

अवश्य वाचा – IPL Flashback : ज्यावेळी CSK हंगामाचा पहिला सामना खेळतं, त्यावेळी कशी राहिली आहे त्यांची कामगिरी??

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 10:13 pm

Web Title: murali vijay in awe as ms dhoni hits a massive six in training psd 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 Video : पाँटींगच्या मार्गदर्शनाखाली अजिंक्यचा फलंदाजीचा सराव
2 IPL 2020 : सलामीला आल्यास रोहित शर्मा हंगामात ५०० धावा काढू शकतो !
3 IPL 2020: ‘मुंबई इंडियन्स’च्या धडाकेबाज खेळाडूचा नवा लूक पाहिलात का?
Just Now!
X