News Flash

VIDEO: निकोलस पूरनची तुफान फटकेबाजी; पंजाबच्या विजयात उचलला मोलाचा वाटा

पूरनच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पंजाबचा विजय

गुणतालिकेत अव्वलस्थानी विराजमान असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाची विजयी घोडदौड पंजाबच्या संघाने रोखली. शिखर धवनच्या दमदार शतकाच्या जोरावर दिल्लीच्या संघाने १६४ धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना निकोलस पूरनच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर पंजाबने ५ गडी आणि ६ चेंडू राखून सामना जिंकला. या विजयामुळे पंजाबच्या संघाने ८ गुणांसह पाचव्या स्थानी झेप घेतली.

१६५ धावांच्या आव्हानात्मक लक्ष्याचा पाठलाग करताना लोकेश राहुल (५) आणि मयंक अग्रवाल (१५) लवकर बाद झाले. ख्रिस गेलने फटकेबाजी करत २९ धावांची खेळी केली. पण पंजाबच्या विजयाचा शिल्पकार ठरला अर्धशतकवीर निकोलस पूरन. पूरनने ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने २८ चेंडूत ५३ धावा केल्या. पाहा त्याची फटकेबाज खेळी-

त्याआधी, दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना पृथ्वी शॉ (७), श्रेयस अय्यर (१४), ऋषभ पंत (१४), मार्कस स्टॉयनीस (९) आणि शिमरॉन हेटमायर (१०) यांचे बळी स्वस्तात गमावले. पण पण शिखर धवनने एक बाजू लावून धरली आणि शतक झळकावले. त्याने ६१ चेंडूत नाबाद १०६ धावांची खेळी केली. त्यात १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्यालाच सामनावीराचा किताब प्रदान करण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 11:52 pm

Web Title: nicolas pooran super fifty batting video ipl 2020 dc vs kxip vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: पंजाबने रोखली दिल्लीची विजयी घोडदौड; पूरनचं दमदार अर्धशतक
2 VIDEO: मराठमोळ्या तुषार देशपांडेला ‘गेल’ वादळाचा तडाखा
3 VIDEO: गब्बर is Back! धवनने ‘असं’ ठोकलं दमदार शतक
Just Now!
X