30 November 2020

News Flash

VIDEO: 4 4 4… राहुलचा जोफ्रा आर्चरला दणका

आर्चर गोलंदाजीला आला अन् राहुलने पहिला चेंडू...

लोकेश राहुल (फोटो सौजन्य - IPL)

पंजाबविरूद्धच्या सामन्यात राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. राजस्थानच्या संघात जोस बटलरचे पुनरागमन झाले. डेव्हिड मिलरच्या जागी त्याला स्थान देण्यात आले. तर सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या जागी अंकित राजपूतला संघात स्थान देण्यात आले. पण राजस्थानचा पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय पूर्णपणे फसला.

बंगळुरूविरूद्धच्या सामन्यात तडाखेबाज शतक करणारा लोकेश राहुल राजस्थानविरूद्धच्या सामन्यातदेखील त्याच लयीत दिसला. सुरूवातीपासूनच राहुल आणि मयंक अग्रवालने तुफान फटकेबाजी केली. राजस्थानचा सर्वोत्तम गोलंदाज जोफ्रा आर्चर यालाही राहुलने सोडलं नाही. आर्चर आपलं पहिलं षटक टाकण्यासाठी आला तेव्हा पंजाबच्या २८ धावा झाल्या होत्या. आर्चरने गोलंदाजी सुरू केल्यावर राहुलने त्याच्या गोलंदाजीचा यथेच्छ समाचार घेतला. आर्चरने टाकलेले पहिले तीनेही चेंडू सीमारेषेबाहेर पाठवत त्याने चौकारांची हॅटट्रिक केली.

बंगळुरूविरूद्धच्या सामन्यातदेखील त्याने तुफान फटकेबाजी केली होती. ६९ चेंडूत त्याने नाबाद १३२ धावा कुटल्या होत्या. त्यात १४ चौकार आणि ७ षटकारांचा समावेश होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 8:29 pm

Web Title: power hitting video kl rahul ipl 2020 rr vs kxip jofra archer vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : पंजाबचा ‘पॉवरप्ले’, राजस्थानच्या गोलंदाजांची धुलाई
2 IPL 2020: ‘मुंबई इंडियन्स’कडून हार्दिक पांड्याबद्दल महत्वाची माहिती
3 IPL 2020: राजस्थानचा ‘रॉयल’ कारभार! पंजाबवर रोमहर्षक विजय
Just Now!
X