02 December 2020

News Flash

IPL 2020 : फायनलपूर्वी मुंबई संघासाठी मोठा दिलासा, दिल्लीच्या चिंतेत वाढ

रोहित शर्मानं साम्यापूर्वी मुंबईच्या चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

(संग्रहित छायाचित्र)

IPL Final 2020, MI vs DC : दुबईतील क्रिकेटच्या रणांगणावर आज, मंगळवारी इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) निकालाची उत्कंठाही शिगेला पोहोचली आहे. पाचव्यांदा जेतेपदासाठी दावेदारी करणाऱ्या मुंबई इंडियन्सपुढे प्रथमच जेतेपद जिंकू इच्छिणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचे कडवे आव्हान असेल. या हायहोल्टेज सामन्यापूर्वी मुंबईच्या चाहत्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार रोहित शर्मानं वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट तंदुरुस्त असल्याचं सांगितलं आहे.

वेगवान गोलंदाजीचा धुरा सांभाळणारा आघाडीचा गोलंदाज ट्रेंड बोल्ट दिल्लीविरुद्ध खेळण्यास तयार आहे. क्वालिफाय सामन्यात दिल्लीबरोबरच बोल्टला जखम झाली होती. यातून बोल्ट सावरला आहे. आयपीएलच्या १३ व्या हंगामात मुंबईसाठी बोल्टने महत्त्वाची भूमिका बजावली होती. पहिल्या सहा षटकांत बोल्टनं आतापर्यंत सात विकेट घेत प्रतिस्पर्धी संघाला सळो की पळो करुन सोडलं आहे. बुमराहबरोबर आता दिल्लीला बोल्टच्या वेगवान माऱ्यालाही सामोरं जावं लागणार आहे.

जेव्हा एखाद्या संघात एकापेक्षा एक विजयवीर असतात, तेव्हा कर्णधाराला फारसे काही सांगण्याची गरज लागत नाही. संपूर्ण स्पर्धेत परिस्थितीनुसार एखाद्या खेळाडूने जबाबदारी घेतली असून संघाला विजयीरेषा ओलांडून दिली आहे. त्यामुळे अंतिम फेरीतही आम्ही आतापर्यंत ज्याप्रमाणे खेळ केला, तसाच अंतिम फेरीतही करू, असा विश्वास रोहितनं व्यक्त केला आहे.

बुमराह आणि बोल्ट या जोडीनं आयपीएलच्या १३ व्या हंगामात ५० पेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. बोल्टनं १४ सामन्यात २२ विकेट घेतल्या आहेत. पहिल्या क्वालिफाय सामन्यातील पहिल्याच षटकांत बोल्टनं दिल्लीच्या दोन फलंदाजांना माघारी झाडलं होतं. बोल्टनं पहिल्याच षटकांत दिल्लीचं कंबरडं मोडलं होतं. त्याने पहिल्याच षटकात पृथ्वी शॉ व अजिंक्य रहाणेला शून्य धावेवर बाद केले. श्रेत्ररक्षण करत असताना १४ व्या षटकांत groin injury मुळे बोल्ट मैदानाबाहेर गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 9:49 am

Web Title: rohit sharma gave good news before ipl final know the update of trent boult nck 90
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 Final : दिल्लीकर रिकी पॉन्टींगचा मुंबईच्या संघाला इशारा, म्हणाला…
2 IPL 2020 : दुबईतील निकालाची उत्कंठा!
3 IPL 2020: युवराजच्या ट्विटला धवनचा भन्नाट रिप्लाय
Just Now!
X