News Flash

IPL 2020: ‘मुंबई इंडियन्स’ने पोस्ट केला भावनिक VIDEO

व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे नक्कीच पाणावतील...

बहुप्रतिक्षित IPL 2020ला १९ सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. यंदा करोनाच्या भीतीने स्पर्धा युएईला खेळवण्यात येणार आहे. त्यानुसार सर्व संघ युएईला दाखल होऊन कसून सराव करताना दिसत आहेत. मुंबईचा संघ जेव्हा युएईला रवाना झाला, तेव्हा जाणाऱ्या अनेक खेळाडूंनी मास्क आणि पीपीई कीट परिधान केले होते. त्यामुळे काही खेळाडू ओळखूदेखील आले नाहीत. मुंबई इंडियन्सच्या अधिकृत फेसबूक अकाऊंटवर २०१९ आणि २०२० असे दोन फोटो पोस्ट करण्यात आल्याने त्यापैकी काही खेळाडू कोण आहेत कळू शकलं. हा जसा एक बदल होता, तसाच आणखी एक बदल म्हणजे प्रेक्षकांविना खेळण्यात येणारे सामने…

आपल्या फॅन्ससाठी मुंबई इंडियन्सने एक अतिशय भावनिक असा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये सामने सुरू असताना चाहत्यांची अनुपस्थिती कशाप्रकारे जाणवेल याबद्दल सांगण्यात आले आहे. स्टेडिअममध्ये फॅन्स असतानाचा माहोल कसा होता ते या व्हिडीओत दाखवण्यात आलं आहे. त्याचबरोबर आता प्रेक्षकांविना खेळण्यात येणाऱ्या सामन्यात काय बदल असतील हेदेखील सांगण्यात आलं आहे. “तुम्ही (चाहते) मुंबईत आणि आम्ही (खेळाडू) दुबईत असं अंतर असलं तरी त्याने आपलं प्रेम कमी होणार नाही. तुम्ही यंदाच्या आयपीएलमध्ये घरातूनच आमच्या संघाचा बारावा खेळाडू बना आणि आम्हाला आधीसारखाच पाठिंबा द्या”, असं भावनिक आवाहन या व्हिडीओतून करण्यात आलं आहे. हा व्हिडीओ पाहून कोणत्याही क्रिकेटप्रेमीचे डोळे नक्कीच पाणावतील इतका सुंदर पद्धतीने हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.

पाहा तो व्हिडीओ-

दरम्यान, मुंबईचा संघ दुबईतील पंचतारांकित सेंट रेजिस सादियात आईसलँड रिसॉर्टमध्ये वास्तव्यास आहे. दुबईतील सर्वात महागड्या रिसॉर्टपैकी हे एक हॉटेल आहे. तेथे सर्व खेळाडू IPL संपेपर्यंत आपल्या पत्नी आणि मुला-मुलींसह राहणार आहेत. सध्या मुंबईचा संघ कसून सराव करताना दिसतो आहे. त्याचेही अनेक व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत. तसेच यंदाच्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने नवीन जर्सी तयार करून घेतली आहे. मुंबई इंडियन्सच्या नव्या जर्सीचे फोटो सध्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2020 6:21 pm

Web Title: sachin tendulkar rohit sharma mumbai indians fans emotional video nostalgic memories must watch vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : ठरलं ! मुंबई इंडियन्सकडून ‘हिटमॅन’ येणार सलामीला
2 IPL 2020बद्दल सुनील गावसकरांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले…
3 IPL 2020: “विराटने काही वेळा चुकीच्या खेळाडूंना पाठिंबा दिला”
Just Now!
X