28 September 2020

News Flash

राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूंना पुन्हा मिळणार शेन वॉर्नचं मार्गदर्शन

वॉर्न राजस्थानचा टीम मेंटॉर म्हणून काम पाहणार

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंना पुन्हा एकदा शेन वॉर्नचं मार्गदर्शन मिळणार आहे. शेन वॉर्नची राजस्थान रॉयल्स संघाचा ब्रँड अँबेसिडर आणि टीम मेंटॉर या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

अवश्य वाचा – TV Presenter नेरोली मेडोव्जचं IPL मध्ये पदार्पण

“राजस्थान रॉयल्स संघासोबत पुन्हा काम करायला मिळतंय याचा मला आनंद आहे. यंदा माझ्यावर दुहेरी जबाबदारी असणार आहे. विविध संघातील अनुभवी आणि तरुण खेळाडूंसोबत यंदा काम करताना मला नक्कीच मजा येणार आहे. यंदाच्या हंगामात अँड्रू मॅक्डोनाल्डसोबत काम करताना संघ चांगली कामगिरी करेल अशी मला आशा आहे.” शेन वॉर्नने माहिती दिली. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्स संघाने आयपीएलच्या पहिल्या हंगामाचं विजेतेपद मिळवलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2020 7:08 pm

Web Title: shane warne returns to rajasthan royals psd 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 आयपीएलच्या ट्रॉफीवरील ‘या’ संस्कृत ओळीचा अर्थ माहिती आहे का??
2 TV Presenter नेरोली मेडोव्जचं IPL मध्ये पदार्पण
3 IPL 2020 : मुंबईच्या गोलंदाजाचं फलंदाजांना आव्हान, सरावात तोडला स्टंप
Just Now!
X