09 March 2021

News Flash

IPL 2020: वॉटसन, डु प्लेसिसची दमदार अर्धशतके; पंजाबच्या गोलंदाजांना फोडला घाम

चेन्नईला दिली शतकी सलामी

शेन वॉटसन, फाफ डु प्लेसिस (फोटो- IPL.com)

IPL 2020 CSK vs KXIP: सलग तीन पराभवांमुळे टीकेचे लक्ष्य ठरलेल्या चेन्नईच्या संघाची गाडी अखेर रविवारी रूळावर आली. पंजाबविरूद्धच्या सामन्यात चेन्नईच्या संघाने निर्विवाद वर्चस्व राखत दणदणीत विजय मिळवला. कर्णधार लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईला १७९ धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या दोघांनी पंजाबच्या गोलंदाजांची प्रचंड धुलाई केली. पंजाबच्या गोलंदाजांना घाम फोडत या दोघांनी चेन्नईसाठी IPLमधील सर्वोत्तम सलामी दिली आणि १० गडी राखत संघाला विजय मिळवून दिला.

पंजाबकडून ख्रिस जॉर्डन ११वे षटक टाकायला आला. त्या षटकात चौकार मारत आधी शेन वॉटसनचे आपलं अर्धशतक पूर्ण केलं. जॉर्डनच्या पहिल्या दोन चेंडूवर चौकार लगावत त्याने ३१ चेंडूत अर्धशतक ठोकलं. IPLमधील हे वॉटसनचं विसावं अर्धशतक ठरलं. त्याने माजी ऑस्ट्रेलियन फलंदाज शॉन मार्शच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्याच षटकात पाचव्या चेंडूवर एकेरी धाव घेत डु प्लेसिसने ३३ चेंडूत अर्धशतक ठोकलं. त्याचं हे IPLमधलं १५वं अर्धशतक ठरलं. त्याने कायरन पोलार्ड आणि मायकल हसीच्या कामगिरीशी बरोबरी साधली. या दोघांनी तुफान फटकेबाजी करत CSKच्या संघासाठी इतिहास रचला. त्या दोघांनी १७९ धावांची सलामी करत संघासाठी IPLच्या इतिहासातील सर्वोच्च भागीदारी केली.

त्याआधी, पंजाबच्या डावात कर्णधार राहुल आणि मयंक अग्रवाल यांनी अर्धशतकी सलामी दिली. मयंक अग्रवालला चांगली सुरूवात मिळाली पण तो २६ धावांवर तो बाद झाला. आज संधी मिळालेला मनदीप सिंगदेखील चांगल्या सुरूवातीनंतर २७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर निकोलस पूरन आणि राहुल यांनी दमदार भागीदारी करून संघाला स्थैर्य दिले. या दोघांनी ५८ धावांनी भागीदारी केली. याचदरम्यान राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. या दोघांच्या फटकेबाजीकडे पाहता पंजाब २००पार पोहोचणार असं वाटत असतानाच शार्दूल ठाकूरने दोन चेंडूत या दोघांना बाद केलं आणि चेन्नईला सामन्यात परत आणलं. ग्लेन मॅक्सवेल आणि सर्फराज यांना शेवटच्या तीन-चार षटकांत अपेक्षित फटकेबाजी जमली नाही, त्यामुळे पंजाबला दोनशेपार मजल मारता आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 4, 2020 10:49 pm

Web Title: shane watson faf du plessis power hitting ipl 2020 csk vs kxip vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : ठोकर खाऊनच माणूस ‘ठाकूर’ बनतो ! सेहवागकडून मराठमोळ्या शार्दुलचं कौतुक
2 IPL 2020 KXIP vs CSK: ‘कॅप्टन कूल’ धोनीचं अनोखं शतक
3 IPL 2020 CSK vs KXIP: ‘चेन्नई’ एक्स्प्रेस रूळावर; पंजाबवर दणदणीत विजय
Just Now!
X