चेन्नई सुपरकिंग्ज विरोधात शुक्रवारी झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने ४४ धावांनी विजय मिळवला. या सामन्यापूर्वी चेन्नई संघाचा अष्टपैलू खेळाडू आणि ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू शेन वॉटसनच्या आजीचं निधन झालं. सामन्याआधी वॅटसनच्या आजीचं निधन झालं तरिही वॅटसन मैदानावरील आपलं कर्तव्य बजावत होता. आजीचं निधन झाल्याचं वॅटसने कोणालाही सांगितलं नाही. सामन्यानंतर त्यानं ही गोष्ट सांगितली आहे.

वॅटसन म्हणाला की, या कठीण प्रसंगावेळी कुटुंबासोबत असायला हवं होतं. पण मला जाता येत नाही. The Debrief या यूट्यूब चॅनलशी बोलताना वॅटसनचे डोळे पाणावले होते. याशिवाय ट्विट करत वॅटसनने आजीला श्रद्धांजलीही वाहिली. यामध्ये तो म्हणतो की, ‘गेले काही दिवस माझ्यासाठी खरेच कठीण होते. माझी मला सोडून गेली. शिवाय क्रिकेटमधील माझा हिरो असलेले डीन मर्व्हिन जोन्स यांचेही निधन झालं’

दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील सामन्यात वॅटसनला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. चांगल्या सुरुवातीनंतरही वॅटसनला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. वॅटसनने १६ चेंडूत १४ धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीत वॅटससने एक चौकर आणि एक षटकार लगावला. दिल्लीने दिलेलं १७६ धावांचे आवाहन चेन्नईला पार करता आले नाही. चेन्नईचे सर्वच दिग्गज फलंजाज स्पशेल अपयशी ठरले. चेन्नईकडून फॅप ड्युप्लेसिसचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.