कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शुबमन गिल आणि राहुल त्रिपाठी हे दोघे पंजाबच्या संघाकडून सलामीला उतरले. या दोघांनी मोहम्मद शमीचं पहिलं षटक खेळून काढलं. दुसऱ्या षटकात अर्शदीप सिंगच्या एकाही चेंडूवर राहुल त्रिपाठीला धाव मिळवता आली नाही. त्याचं संपूर्ण षटक निर्धाव गेलं. त्यामुळे राहुल त्रिपाठीवर खूप दडपण वाढलं. असं असताना शमीच्या षटकात दुसऱ्या चेंडूवर राहुल त्रिपाठीने बॅट फिरवत चौकार लगावला. पण त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शमीच्या अप्रतिम स्विंग गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. चेंडू टप्पा पडून एकदम आत वळला आणि त्रिपाठीला काहीही कळण्याच्या आतच स्टंप उडाला.
कोलकाता आणि पंजाब या संघांमध्ये प्रत्येकी एक-एक बदल करण्यात आला. शेल्डन कॉट्रेल दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी संघात ख्रिस जॉर्डनला संधी देण्यात आली. तर कोलकाताच्या संघानेही वेगवान गोलंदाजाला संधी दिली. त्यांनी शिवम मावीच्या जागी प्रसिध कृष्णाला संघात जागा दिली.
राहुल त्रिपाठीने आधीच्या सामन्यात दमदार खेळी केली होती. त्याने चेन्नईविरूद्धच्या सामन्यात केवळ ५१ चेंडूत ८१ धावांची धडाकेबाज खेळी केली होती. त्यात त्याने ८ चौकार आणि ३ षटकार लगावले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 10, 2020 4:11 pm