24 January 2021

News Flash

IPL 2020: राशिद खानला षटकार लगावत फिंचने केला नवा पराक्रम

तुम्हाला माहिती आहे का फिंचची 'ही' कामगिरी

IPL 2020 Playoffs च्या दुसऱ्या सामन्यात बंगळुरूच्या संघाविरूद्ध हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूच्या संघात आरोन फिंचचा समावेश असतानाही विराट कोहलीने देवदत्त पडीकलसोबत सलामीला येणं पसंत केलं. बंगळुरूच्या कर्णधाराचा हा निर्णय संघाला चांगलाच महागात पडला. डावाच्या दुसऱ्याच षटकात विराट कोहलीला जेसन होल्डरने माघारी धाडलं. त्यानंतर देवदत्त पडीकलही चौथ्या षटकात माघारी परतला, पण ऑरोन फिंचने संघर्षपूर्ण खेळी करत एक पराक्रम केला.

फिंचने एबी डीव्हिलियर्ससोबत ४१ चेंडूत ४१ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. राशिद खानच्या फिरकीचा समाचार घेताना फिंचने उत्तुंग असा षटकार लगावला. याच षटकारासोबत फिंचने IPL कारकिर्दीत २ हजार धावांचा टप्पा गाठला. परंतु त्यानंतर मोठी धावसंख्या उभारणं फिंचला शक्य झालं नाही. ३० चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार लगावत तो ३२ धावांवर बाद झाला.

त्यानंतर एबी डीव्हिलियर्सने एकाकी झुंज देत संघाला शंभरी गाठून दिली. डीव्हिलियर्सने दमदार अर्धशतक ठोकलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2020 9:16 pm

Web Title: video big achievement aaron finch completes 2000 runs mark in ipl 2020 rcb vs srh vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 VIDEO: सुपरकॅच! चेंडू वरून जाताना फिल्डरने हवेत घेतली झेप अन्…
2 IPL 2020 : मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये ‘बाप्पा’ला आहे विशेष स्थान, फोटो व्हायरल
3 IPL 2020 : ‘विराट’सेनेचं पॅकअप, रंगतदार सामन्यात हैदराबाद ६ गडी राखून विजयी
Just Now!
X