03 March 2021

News Flash

VIDEO: अफलातून स्विंग… काहीही कळण्याआधीच पृथ्वी शॉ त्रिफळाचीत

तुम्ही पाहिलात का 'हा' व्हिडीओ?

दिल्लीविरूद्धच्या सामन्यात देवदत्त पडीकलचे दमदार अर्धशतक आणि शेवटच्या टप्प्यात एबी डीव्हिलियर्सने केलेली फटकेबाजी याच्या बळावर बंगळुरूने ७ बाद १५२ धावांपर्यंत मजल मारली. एनरिक नॉर्येने ३ बळी टिपत बंगळुरूच्या धावगतीला वेळीचा आवर घातला, पण देवदत्त पडीकलने ४१ चेंडूत ५० धावा करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. त्याचे हे यंदाच्या हंगामातील पाचवे अर्धशतक ठरले.

या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईकर पृथ्वी शॉ चांगली खेळी करू शकला नाही. पृथ्वी शॉने दमदार सुरूवात करत पहिल्या ५ चेंडूत २ चौकार लगावले होते. पण मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचीत झाला. सरळ वाटणारा चेंडू हलकेच खेळण्याचा पृथ्वी शॉ चा मानस होता, पण टप्पा पडल्यावर चेंडू स्विंग झाला. चेंडू कसा वळला हे पृथ्वी शॉला समजलंच नाही. त्यामुळे चेंडू बॅटला न लागता शॉ ९ धावांवर त्रिफळाचीत झाला.

दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर याने नाणेफेक जिंकली. बंगळुरूचा सलामीवीर जोशुआ फिलीप (१२) स्वस्तात बाद झाला. सलामीवीर देवदत्त पडीकल आण विराट कोहली यांनी डाव पुढे नेला. पण २४ चेंडूत २९ धावा करून विराट माघारी परतला. त्यानंतर पडीकलने डीव्हिलियर्सच्या साथीने भागीदारी करत डावाला आकार दिला. पडीकलने ४१ चेंडूत ५ षटकारांसह ५० धावा केल्या. त्याचे हे हंगामातील पाचवे अर्धशतक ठरले. पडीकल बाद झाल्यावर डीव्हिलियर्सने फटकेबाजी केली, पण मोक्याच्या क्षणी तो २१ चेंडूत २ षटकारांसह ३५ धावा करून बाद झाला. शिवम दुबेनेही ११ चेंडूत १७ धावा केल्या. त्यामुळे संघाला १५०पार मजल मारता आली. दिल्लीकडून एनरिक नॉर्येने ३, कगिसो रबाडाने २ तर अश्विनने १ बळी टिपला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 2, 2020 10:18 pm

Web Title: video clean bowled mumbai cricketer prithvi shaw mohd siraj superb swing delivery ipl 2020 rcb vs dc vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 IPL 2020: पडीकलचं दमदार अर्धशतक; बंगळुरूची १५०पार मजल
2 RCB vs DC: IPLच्या १३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली ‘ही’ गोष्ट
3 IPL 2020: …तर धोनीसाठी ‘ती’ गोष्ट अशक्यच- कपिल देव
Just Now!
X