25 November 2020

News Flash

Video: जोफ्रा आर्चरने केली जसप्रीत बुमराहची नक्कल

तुम्ही पाहिलात का व्हिडीओ?

मुंबईविरूद्धच्या सामन्यात बेन स्टोक्सने केलेल्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर राजस्थानने ८ गडी राखून विजय मिळवला. किशन-सूर्यकुमार यांची संयमी भागीदारी आणि हार्दिक पांड्याच्या फटकेबाज ६० धावांच्या खेळीमुळे मुंबईच्या संघाने २० षटकांत १९५ धावांपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाची सुरूवात खराब झाली. पण बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन जोडीने नाबाद दीडशतकी भागीदारी करत संघाला दमदार विजय मिळवून दिला. राजस्थानच्या विजयामुळे त्यांचे स्पर्धेतील आव्हान कायम राहिले, पण चेन्नईचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

जोफ्रा आर्चरने या सामन्यात ३१ धावा देत २ गडी बाद केले. क्विंटन डी कॉक आणि सौरभ तिवारी यांना त्याने बाद केले. या सामन्यात जोफ्रा आर्चर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल करताना दिसला. नेट्समध्ये सराव करत असताना आर्चरने बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीची नक्कल केली. यावेळी आर्चरला स्वत:लाही हसू आवरलं नाही.

दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना फॉर्मात असलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाची राजस्थानविरुद्ध सामन्यात खराब सुरुवात झाली. इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८३ धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. यानंतर शेवटच्या ४ षटकांत हार्दिक पांड्याने नाबाद राहत २१ चेंडूत ६० धावा केल्या. १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या डावाचीही सुरूवात फारशी चांगली झाली नाही. रॉबिन उथप्पा (१३) आणि स्टीव्ह स्मिथ (११) दोघे स्वस्तात माघारी परतले. पण त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन जोडीने दीडशतकी भागीदारी करत सामना जिंकला. स्टोक्सने दमदार शतक (१०७*) केलं. तर संजू सॅमसनने नाबाद ५४ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 26, 2020 7:03 pm

Web Title: video jofra archer imitates jasprit bumrah bowling action during ipl 2020 mi vs rr match vjb 91
टॅग IPL 2020
Next Stories
1 IPL 2020 : RCB च्या अडचणींमध्ये वाढ होण्याचे संकेत, महत्वाच्या गोलंदाजाला दुखापत
2 IPL 2020: सेहवागने उडवली विराट, डीव्हिलियर्सची खिल्ली; म्हणाला…
3 IPL 2020 : तू तेव्हाही विजेता होतास आणि आजही आहेस ! धोनीसाठी साक्षीचा खास संदेश
Just Now!
X