News Flash

Video: तडाखेबाज फलंदाजी, धारदार गोलंदाजी… ‘सामनावीर’ स्टॉयनीसचा डॅशिंग अंदाज

अष्टपैलू खेळ करणारा स्टॉयनीस ठरला सामनावीर

सनरायझर्स हैदराबाद संघाला मोक्याच्या सामन्यात पराभूत करत दिल्लीने पहिल्यांदाच IPLच्या अंतिम फेरीत धडक मारली. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवन याने ५० चेंडूत ७८ धावा करत संघाला १८९ धावांपर्यंत मजल मारून दिली. या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना केन विल्यमसनने संघर्षपूर्ण अर्धशतक ठोकलं, पण त्याला संघाला विजय मिळवून देता आला नाही.

कगिसो रबाडाने लौकिकाला साजेशी गोलंदाजी करत ४ बळी टिपले पण सामन्याचा हिरो ठरला मार्कस स्टॉयनीस. त्याने अष्टपैलू कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. फलंदाजीत बढती मिळाल्यावर सलामीवीर मार्कस स्टॉयनीसने ५ चौकार आणि १ षटकार ठोकत ३८ धावा ठोकल्या. तो मोठी धावसंख्या उभारण्याच्या तयारीत असतानाच त्रिफळाचीत झाला.

गोलंदाजीतही त्याने दमदार कामगिरी केली. प्रियम गर्ग आणि मनिष पांडे या दोघांमध्ये चांगली भागीदारी होत असतानाच स्टॉयनीसने एका षटकात हैदराबादला दोन धक्के दिले. आधी प्रियम गर्ग १७ धावांवर त्रिफळाचीत झाला. तर शेवटच्या चेंडूवर मनिष पांडे २१ धावांवर झेलबाद झाला. त्यानंतर हैदराबाद हुकुमी एक्का ठरू पाहणारा केन विल्यमसन यालाही त्याने रबाडाकडे झेल देण्यास भाग पाडले. स्टॉयनीसने ३ षटकात २६ धावा देत ३ गडी टिपले.

दरम्यान, आता १० नोव्हेंबरला अंतिम सामन्यात दिल्लीपुढे मुंबईचे आव्हान असणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 9, 2020 8:05 am

Web Title: video marcus stoinis all round performance big hitting batting superb bowling ipl 2020 dc vs srh vjb 91
टॅग : IPL 2020
Next Stories
1 बेंगळूरुच्या कर्णधारपदासाठी कोहलीला सेहवागचा पाठिंबा
2 IPL 2020: अरेरे… राशिदने थोडक्यात गमावली बुमराहशी बरोबरी करण्याची संधी
3 Video: भन्नाट गोलंदाजी! राशिद खानने उडवला स्टॉयनीसचा त्रिफळा
Just Now!
X